नागपूरः अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर हमखास नोकरीची हमी देणाऱ्या डीटीएड (डिप्लोमा इन टीचिंग एज्युकेशन -डी.एड.) मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी उत्सुक नसल्याचे चित्र आहे. मागील अनेक वर्षांपासून शिक्षकांची शासकीय भरती रखडल्याने या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. यासोबतच खासगी शाळांमध्ये शिक्षकांची परवड, शासनाचे उदासीन व वारंवार बदलणारे धोरण अशा अनेक कारणांमुळे परिस्थिती विपरीत झाली आहे. शिक्षकी पेशासाठी आवश्यक डीटीएड. प्रवेश घेण्यासाठी नोंदणी करण्याची 21 जुलैपर्यंत होती. मात्र जिल्ह्यात असलेल्या डीएलएडच्या (D.T.Ed) 2600 जागांसाठी केवळ 689 अर्ज मान्य झाले आहेत. 
डीटीएड अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थी शिक्षक बनायचे. मात्र, नंतर नोकरी मिळवण्यासाठी पुन्हा टीईटी ही स्पर्धा देणे बंधनकारक आहे. दरम्यान, टीईटीमध्ये होणारे घोळ पाहता ती देऊनही नोकरीसाठी ताटकळत राहावे लागत असल्याने डीटीएड प्रवेशाची संख्या घटली आहे. नोकरीसाठी बराच काळ थांबावे लागते, थांबूनही नोकरीची शाश्वती नसते. सध्या शिक्षक भरती बंद आहे. नोकरीच्या सुरक्षिततेअभावी विद्यार्थ्यांच्या प्रवेशात घट झाली.


Jammu Kashmir : स्वातंत्र्यदिनापूर्वी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला, दोन दहशतवाद्यांचा खात्मा, 3 जवान शहीद


70 डीएड महाविद्यालये बंद


काही वर्षांपूर्वी नागपूर जिल्ह्यात डीएड कॉलेजची संख्या 100 हून अधिक होती, त्यातील 70 हून अधिक संस्था बंद पडल्याने केवळ 30 महाविद्यालये शिल्लक आहेत. त्यात 1 शासकीय, 8 अनुदानित व इतर विनाअनुदानित महाविद्यालयांची संख्या आहे. यातल्या काहींनी अधिकृतपणे बंद केली नसल्याने त्यांना गृहीत धरले जात आहे. 2004 पूर्वी संपूर्ण राज्यात डीएड 113 महाविद्यालये होती. 2004 नंतर ही संख्या 450 वर गेली आणि 2008 मध्ये राज्यात 1156 डीएड संस्था होत्या. 2012 नंतर भरती बंद झाल्याने विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याने महाविद्यालये बंद पडली. विभागात 117 डीटीएड संस्था आहेत. 


स्थिती



  • जागा - 2600

  • संस्था - 30

  • अर्ज - 900

  • मान्य अर्ज -689 


शिक्षकभरती नसल्याने...



  • 8 वर्षांपासून शिक्षक भरती नाही. शाश्वती नसल्याने अनेकांनी इच्छा असूनही हा अभ्यासक्रमात प्रवेशाचा विचार सोडला.

  • शिक्षकांच्या नोकरीसाठी आवश्यक असलेला बीएबीएसड 4 वर्षीय नव्या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमाकडे कल वाढला.

  • डीएड झाल्यावर शासकीय शिक्षकाच्या नोकरीसाठी टीईटी परीक्षा पास करणे आवश्यक, खासगी शाळा बी.एडला मागणी.

  • नोकरीची हमी नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश कमी, शिक्षण संस्थाही बंद, महाविद्यालयातील प्राध्यापकही झाले बेरोजगार


Aurangabad:जालन्यातील 390 कोटींच्या घबाडाचं औरंगाबाद कनेक्शन, पैसे मोजता-मोजता अधिकारी पडले आजारी


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI