Raid 2 Box Office Collection Day 26: 1 मे रोजी प्रदर्शित झाल्यानंतर अजय देवगणचा (Ajay Devgn) 'रेड 2' (Raid 2) हा चित्रपट सलग 25 दिवस बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) राज्य करत होता. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रेड'च्या दुसऱ्या भागात अमय पटनायक म्हणून अजय देवगणला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं आहे.
आज चित्रपट प्रदर्शित होऊन 26 दिवस उलटलेत आणि आज चित्रपटाच्या कमाईशी संबंधित सुरुवातीचा डेटा देखील समोर आला आहे, तर चला जाणून घेऊयात की, चित्रपटानं आतापर्यंत किती कमाई केली आहे, आता येत्या काळात 'रेड 2' कोणता विक्रम रचणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
'रेड 2'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
अधिकृत आकडेवारीनुसार, 'रेड 2'नं 22 दिवसांत 161.79 कोटी रुपये कमावले. यानंतर, 23 व्या आणि 24 व्या दिवशी, चित्रपटानं अनुक्रमे 1 कोटी आणि 1.85 कोटी रुपये कमावले, असं सॅक्निल्कनं म्हटलं आहे. 25 व्या दिवशी म्हणजेच, रविवारी चित्रपटाची कमाई 2.4 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.
अशाप्रकारे चित्रपटानं 25 दिवसांत 167.04 कोटी रुपये कमावले. 26 व्या दिवशी म्हणजेच, आज सकाळी 10:15 वाजेपर्यंत चित्रपटानं 0.75 कोटींची कमाई केली आहे आणि एकूण कलेक्शन 167.79 कोटींवर पोहोचलं आहे. दरम्यान, हे आकडे अंतिम नाहीत, यामध्ये बदल होऊ शकतात.
'रेड 2'चं बजेट आणि वर्ल्डवाइड कलेक्शन
'रेड 2' हा चित्रपट 48 कोटी रुपये खर्चून बनवण्यात आला होता आणि सॅक्निल्क मते, चित्रपटानं 25 दिवसांत जगभरात 223.50 कोटी रुपये कमावले आहेत. जर आपण आजची कमाई यात जोडली तर ती 224.25 कोटी रुपये होते. याचा अर्थ चित्रपटानं त्याच्या बजेटपैकी जवळपास 470 टक्के रक्कम वसूल केली आहे.
या वर्षीच्या पहिल्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'छावा'बद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटानं भारतात 601.54 कोटी रुपये कमावले, म्हणजेच या चित्रपटानं केवळ भारतात त्याच्या बजेटपेक्षा 462 टक्के जास्त कमाई केली, कारण त्याचं बजेट 130 कोटी रुपये होतं. जर आपण विक्की कौशलच्या चित्रपटाच्या भारतीय कमाईची तुलना 'रेड 2' च्या जगभरातील कमाईशी केली, तर 'रेड 2'नं 'छावा'पेक्षा सुमारे 8 टक्के जास्त कमाई केली आहे.
दरम्यान, 'रेड 2'मध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्यात जोरदार लढाई पाहायला मिळाली. या चित्रपटात अमित सियाल आणि सौरभ शुक्ला सारखेच चेहरे आहेत, जे जुन्या चित्रपटात होते. तर इलियाना डिक्रूजच्या जागी वाणी कपूरला घेण्यात आलंय.