Maharashtra Assembly Session : अखेर राज्याच्या विधीमंडळाच्या अधिवेशनाला मुहूर्त सापडला आहे. विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Session) 17 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. 17 ते 26 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी पावसाळी अधिवेशन हे 18 जुलै रोजी होईल असे घोषित करण्यात आले होते. मात्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील बंडामुळं महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान, 17 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनासाठी विधानसभा कामकाज सल्लागार समितीवरील सदस्यांची नामनियुक्त यादी जाहीर करण्यात आली आहे.


विधानसभा कामकाज सल्लागार समितीवर खालील सदस्यांची नामनियुक्ती 


समिती प्रमुख


१) अॅड. राहुल नार्वेकर,  (अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा तथा समिती प्रमुख)


सदस्य


1)  एकनाथ शिंदे, मा. मुख्यमंत्री
2)  देवेंद्र फडणवीस, मा. उप मुख्यमंत्री
3) अजित पवार, मा. विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा
4) राधाकृष्ण विखे-पाटील, मा. मंत्री
5) सुधीर मुनगंटीवार, मा. मंत्री
6) चंद्रकांत पाटील, मा.मंत्री
7) दादाजी भुसे, मा.मंत्री
8)  उदय सामंत, मा. मंत्री
9) जयंत पाटील, विधानसभा सदस्य 
10) बाळासाहेब थोरात, विधानसभा सदस्य
11) अशोक चव्हाण, विधानसभा सदस्य


निमंत्रित सदस्य


1) नरहरी झिरवाळ, माजी उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा
2) अॅड. आशिष शेलार, विधानसभा सदस्य 
3) छगन भुजबळ, विधानसभा सदस्य 
4) अमिन पटेल, विधानसभा सदस्य 


विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीत शिवसेनेच्या अंबादास दानवे आणि अनिल परब यांचा समावेश करण्यात आला आहे. विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीत ठाकरे गटाला स्थान मिळालेलं नाही. तिथे शिंदे गटाला स्थान देण्यात आलं आहे. पण विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीत मात्र ठाकरे गटाला स्थान देण्यात आलं आहे.


विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीत आंबादास दानवे यांचा आणि अनिल परब यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, विधानसभा कामकाज सल्लागार समितीवर ठाकरे गटाला संधी देण्यात आली नाही. त्यामुळं आता विधीमंडळाच्या अधिवेशनावरुन शिंदे आणि ठाकरे गटाच्या वादाचा
तिसरा अंक सुरु झाला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: