नागपूर: रासायनिक रंग आणि प्लॅास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी समस्त नागपूरकरांनी मातीच्या इकोफ्रेंडली गणेशाची स्थापना करून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा. असे आवाहन नागपूर महानगरपालिकेने नागपूरच्या सर्व नागरिकांना केले आहे. 31 ऑगस्ट (Ganesh Chaturthi 2022) रोजी गणेशाची स्थापना होत असून यावर्षीचा गणेशोत्सव (Ganesh Chaturthi) मोठ्या उत्साहाने आपण साजरा करणार आहोत. 


यावर्षीचा गणेशोत्सव हा पर्यावरण पुरक व्हावा याकरिता POP गणेश मूर्तीची स्थापना न करता, मातीच्या, इकोफ्रेंडली गणेशाची आपण स्थापन करूया असे आवाहन मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे करण्यात आले आहे. POPच्या मुर्त्या अवघटनशील असतात. तसेच POP मध्ये उष्णतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे अधिक मात्रेत त्वचेच्या संपर्कात आल्यास, त्वचेची जळजळ होते. 


हानीकारक रंगांपासून सावधान


POPच्या मुर्त्यांमध्ये वापरण्यात येणारे रंग घातक रसायण व धातु मिश्रीत असतात. जसे की, तांबे, क्रोमियम, कॅडमियम, निकेल, लेड, मक्युरी इत्यादी जे पर्यावरण आणि मानवाकरीता हानीकारक (chemical colour) असतात. रासायनिक रंगामुळे तलावात, पाण्यात घातक धातुंची मात्रा वाढल्याने जलचरांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. जो अन्न साखळीद्वारे मानवास देखील घातक ठरू शकतो. त्यामुळे, नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तीची स्थापना करू नये.

मूर्ती खरेदी करतांना खात्री करून घ्या


नागरीकांनी दुकानदार, व्यावसायिक यांच्या कडुन श्री गणेशाची मुर्ती खरेदी करतांना श्री गणेशाची मुर्ती संपुर्ण मातीची किंवा शाडु मातीची असेल अशी खात्री करूनच मुर्तीची खरेदी करून घ्यावी. पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचीच स्थापना घरोघरी करण्यात यावी, असे नागपूर महानरपालिकेद्वारे जाहिर आवाहन करण्यात येत आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Nagpur Miss Nation 2022: 'मिस नेशन 2022'मध्ये नागपूरच्या सिद्धी, मुस्कानचा जलवा


Nitin Gadkari : नागपूर शहरात साकारणार महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क, 9 हजार गरजूंना नि:शुल्क सहाय्यक साधनांचे वितरण