नागपूर : राज्यात भंडारा (Bhandara- Gondia)  गोंदिया लोकसभा मतदारसंघातून (Election 2024) निवडणूक लढण्यास सज्ज आहे असं प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी म्हटलंय. भंडारा गोंदियावर अजित पवार (Ajit Pawar) गटाचा दावा राहील असं पटेल म्हणाले. तसंच राज्याच्या प्रत्येक रिजनमध्ये आम्हाला आणि शिंदे गटाला जागा अपेक्षित आहेत असं पटेल म्हणाले. ते नागपुरात बोलत होते. 


प्रफुल पटेल म्हणाले, भंडारा गोंदिया मतदारसंघात राष्ट्रवादी नेहमीच मजबूत राहिली आहे. त्यामुळे त्या जागेवर आमचा क्लेम नैसर्गिक राहणार आहे.  माझ्या तयारीचा प्रश्न नसतो  मी सदैव तयार असतो. विदर्भात आम्हाला जागा हव्या आहे. राज्यात प्रत्येक  भागात  आम्हाला आणि शिंदे गटाला जागा अपेक्षित आहे. लोकसभेचे जागा वाटप भाजपच्या नेतृत्त्वात होणार आहे. भाजपचे जास्त खासदार आमदार आहेत त्यामुळे साहजिक लोकसभेसाठी त्यांचा मोठा दावा असणार आहे. 


365 दिवस गोंदिया -भंडाऱ्याच्या संपर्कात : प्रफुल पटेल


प्रफुल पटेल म्हणाले,  भंडारा जिल्ह्यातून मी अनेक वर्ष  खासदार म्हणून निवडून आलो आहे. भंडारा  जिल्हा मतदारसंघ  आणि माझं नातं वेगळा आहे. विदर्भात सगळ्यात बळकट राष्ट्रवादी हे गोंदिया भंडारा जिल्ह्यात आहे. स्वाभाविकपणे ही राष्ट्रवादीला मिळणे अपेक्षित आहे.  चर्चा होत असताना बऱ्याच गोष्टींचा खुलासा होईल भाष्य करणार नाही. भंडारा- गोंदियासाठी आग्रह केलेला नाही पण जेव्हा तयारीची गोष्ट करता 365 दिवस गोंदिया -भंडाऱ्याच्या संपर्कात असतो. त्यामुळे त्यासाठी मला वेगळं काम करण्याची गरज नाही.


राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या केसमध्ये फरक : प्रफुल पटेल


आमदार अपात्रता निर्णयावर बोलताना प्रफुल पटेल म्हणाले, ही एक न्यायीक प्रक्रिया आहे. निवडणूक कोर्ट हे सुद्धा ज्यूडिशीअल प्रक्रिया आहे. त्या निर्णयावर भाष्य करणे टीका करणे हे योग्य नाही. सुप्रीम कोर्टाने सुद्धा निकाल विधानसभा अध्यक्षांनी द्यावा असं सांगितलं. याचा अर्थ अधिकार  विधासनभा अध्यक्षांकडे  हे  अधिकार असल्याचे सु्प्रीम कोर्टाला मान्य आहे. अजित पवार यांनी पक्षाची जबाबदारी स्वीकारून नेतृत्व करावे. हा निर्णय पक्षात आलेले पदाधिकारी आणि निवडून आलेल्या जनप्रतिनिधींनी बहुमतांनी निर्णय घेतला. आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो आमची याचिका दाखल केली. आमची आणि शिंदे यांची केस वेगळी आहे.


लोकसभा आणि विकासकामांचे काही संबंध नाही: प्रफुल पटेल


पंतप्रधान नरेंद्र हे मागच्या महिन्यात येऊन गेले होते. लोकसभा आणि विकासकामांचे काही संबंध नाही. विकासकाम एका दिवसात होत नाही, तर यासाठी  वर्ष लागतात. तरुण पिढीला यात रोजगार पाहिजे त्यासाठी काम होत आहे, असे देखील प्रफुल पटेल म्हणाले. 


 



हे ही वाचा :


"देवेंद्र फडणवीस म्हणजे शुर्पणखा, या शुर्पणखेचे नाक कापल्याशिवाय आम्ही राहणार नाही", संजय राऊतांची जहरी टीका