मुंबई : बाळासाहेब (Balasaheb Thackeray) वाघ असतील तर तुम्ही महाराष्ट्राला लागलेले डाग आहे, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) यांनी केला केला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणजे शुर्पणखा आणि या शुर्पणखेचे नाक कापल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब वाघ असतील तर तुम्ही महाराष्ट्राला लागलेले डाग आहे. कधी असं ऐकलं आहे का की कोण आला रे कोण आला भाजपचा वाघ आला. शिवसेना हीच खरी वाघांची सेना आहे. बाबरी पा़डल्यानंतर त्याचे आरोपपत्र एकदा फडणवीसांनी बघावं. राम मंदीर फक्त एकाच व्यक्तीमुळे उभे राहिले आहे असे त्यांना वाटतं. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चेलेचपाटे एक नंबरचे खोटारडे आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणजे शुर्पणखा, या शुर्पणखेचे नाक कापल्याशिवाय आम्ही राहणार नाही.
राममंदिराच्या उद्घाटनावर चारही शंकराचार्यांचा बहिष्कार : संजय राऊत
राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाला चारही शंकराचार्यांनी बहिष्कार घातला त्याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, देशातील सर्वात मोठे शंकराचार्य नरेंद्र मोदी आहेत, असं भाजपाला वाटत असावे. त्यामुळे श्री राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाला शंकराचार्य येत नसतील. अर्धवट झालेल्या राम मंदिराच्या उद्घाटनावर चारही शंकराचार्यांनी बहिष्कार घातला आहे, असे संजय राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात जाणार म्हणून मोदी मंदिरात गेले: संजय राऊत
नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येत आहेत..काळाराम मंदिरात ते दर्शन घेत आहेत. आधी ते रोडशो, सभा करणार होते. मात्र काळाराम मंदिरातील कार्यक्रम ऐनवेळी ठरला आहे. कारण उद्धव ठाकरे 22 तारखेला काळाराम मंदिरात जाऊन पूजा करणार होते म्हणून यांनी हा कार्यक्रम केला. मी सांगंतो उद्धव ठाकरे मणिपुरातील राम मंदिरात शिवसेना जाणार आहे, तेव्हा मोदींनी मणिपुरातही यावं, असे संजय राऊत म्हणाले.
निवडणुकांसाठी उद्घाटन रखडवले : संजय राऊत
उद्घटनाअभावी रखडलेल्या प्रकल्पावर बोलताना संजय राऊत म्हणासे, आदित्य ठाकरें यांनी वारंवार प्रश्न विचारले होते. एखादा प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्याचं वेळेत उद्घाटन होणं आवश्यक आहे. ठाकरे सरकारच्या काळात या एमटीएचएलला गती मिळाली. तो उद्घाटनासाठी अशाप्रकारे रोखून ठेवणं चूक आहे. मोदींचा वेळ मिळत नाही म्हणून उद्घाटन रखडवले आहे. निवडणुका पुढे ठेवून त्याचं उद्घाटन थांबवले होते.
हे ही वाचा :