नागपूर : गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यातील गट्टा गावात नक्षलवाद्यांनी पुन्हा बॅनर लावले आहेत. विशेष म्हणजे या बॅनरवर टार्गेट असलेल्या सात जणांची नावं लिहिली आहेत.


जांबिया-गट्टा भागात 6 मे रोजी शिशिर मंडल या व्यक्तीची पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन हत्या करण्यात आली होती.
त्यानंतर आता सात जणांची नावं बॅनरवर लिहून हे आमचे पुढील टार्गेट असल्याचा इशारा नक्षलवाद्यांनी दिला आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण आहे.

नक्षलवाद्यांनी जांबिया गावातील समाज मंदिर, आयटीआय, वनविभागाचा तपासणी नाका अशा अनेक ठिकाणी बॅनर आणि पत्रकं लावली आहेत.
VIDEO | नक्षलींच्या धमकीचे बॅनर हटवले, 11 शूरवीर मावळ्यांची चपराक


महाराष्ट्र दिनी नक्षलींनी गडचिरोलीतील जांबुडखेडा मार्गावरील लेंडारी पुलावर भीषण स्फोट घडवला होता. या दुर्घटनेत गडचिरोली पोलिसांच्या शीघ्र कृती दलाच्या 15 जवानांसह एका खाजगी वाहन चालकाचा मृत्यू झाला होता

दरम्यान, उपराजधानी नागपूरपासून फक्त 160 किलोमीटर अंतरावर साधं 'भारत माता की जय' म्हणायलाही लोकांना भीती वाटत असल्याचं चित्र आहे. 'नक्षलवाद मुर्दाबाद' म्हणताच लोकांनी घराची दारं बंद करुन टाकली.
प्रफुल दादा, कुरखेडा मार्गावर आम्ही यशस्वी झालो, गडचिरोलीच्या रस्त्यावर गूढ संदेश

दादापूरला दोन दिवसापासून नक्षली ठाण मांडून होते, मिलिंद तेलतुंबडेही स्वतः उपस्थित असल्याची माहिती आहे. 15 पोलिसांचा जीव घेणारा भूसुरुंग पुरल्यानंतर नक्षली प्रतिनिधींनी आजूबाजूच्या गावात त्या मार्गावरुन वाहनांना जाण्यास पूर्ण बंदी केली. पण दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पोलिसांना ती माहिती मिळू न शकल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. जाळपोळ करायला आलेले 100-150 लोक गोंडी भाषेत बोलत होते, असं नक्षली बॅनर जाळून आलेल्या 11 शूरवीरांनी सांगितलं.