एक्स्प्लोर

Nagpur Tekdi Flyover Bridge : नागपूरमधील टेकडी उड्डाणपूल पाडण्याचं काम उद्यापासून सुरु होणार

Nagpur Tekdi Flyover Bridge Demolition : नागपूरच्या प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिर समोरचा टेकडी उड्डाणपूल पाडण्याचं काम उद्या म्हणजेच बुधवारपासून (19 जुलै) सुरु केलं जाणार आहे.

Nagpur Tekdi Flyover Bridge Demolition : नागपूरच्या (Nagpur) प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिर समोरचा टेकडी उड्डाणपूल (Tekdi Flyover Bridge) पाडण्याचं काम उद्या म्हणजेच बुधवारपासून (19 जुलै) सुरु केलं जाणार आहे. मानस चौकाच्या दिशेने उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरु केले जाणार असून पुढील पंधरा दिवसात संपूर्ण उड्डाणपूल पाडण्याचे लक्ष्य आहे. 

सुरुवातीला उड्डाणपूल पाडण्याचं काम सोमवारीच (17 जुलै) सुरु होणार होते. परंतु नागपूर महापालिकेकडून (Nagpur Municipal Corporation) अधिकृत पत्र न मिळाल्याने उड्डाणपूल  पाडण्याचे काम लांबल्याचं मेट्रो प्राधिकरणाने सांगितलं.

म्हणून उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय

2008 मध्ये 16 कोटी 23 लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेला हा उड्डाणपूल दहा मीटर रुंद आहे. मात्र, रेल्वे स्टेशनच्या समोरील भागात वाढलेली वाहतूक पाहता सध्या हा उड्डाणपूल अपुरा आणि गैरसोयीचा ठरत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकासमोरची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि परिसरातील इतर विकासकामे लक्षात घेऊन महापालिकेने हा उड्डाणपूल पाडण्याचे ठरवलं आहे. 

दरम्यान जुन्या उड्डाणपुलाखाली यापूर्वी अनेक दुकानं होती. त्या दुकानांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे. त्यासाठी महा मेट्रोने 111 दुकाने बांधली असून त्यामध्ये व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करण्यात आलं आहे. पुलाखाली असलेल्या दुकानांना स्थलांतरित करण्याची जबाबदारी महापालिकेकडे होती. गेल्या पाच वर्षांपासून महापालिकेचे वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरू होते. अखेर त्याला यश आलं आहे.

उड्डाणपूल पाडून सहा पदरी रस्ता होणार

उड्डाणपूल पाडण्याचे काम कोणत्याही त्रुटी शिवाय व्हावे, या उद्देशाने ती जबाबदारी महामेट्रोकडे सोपवण्यात आली आहे. भविष्यात या ठिकाणी मोठा आणि प्रशस्त उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन आहे. उड्डाणपूल पाडून हा रस्ता सहा पदरी होणार आहे. तसंच रेल्वे स्थानकावर येणाऱ्यांसाठी पार्किंगची सोय आणि 200 दुकानांचे शॉपिंग कॉम्प्लेक्स इथे बनणार आहे.

पाडकामादरम्यान अशी असेल वाहतूक व्यवस्था

  • उड्डाण पुलावरुन जयस्तंभ चौक आणि मानस चौकाकडे जाण्यास बंदी असेल
  • सेंट्रल एवेन्यूकडून एलआयसी किंवा आरबीआय चौकाकडे जाणारी वाहतूक आणि त्या उलट वाहतूक पूर्वीप्रमाणे कार्यरत राहिल.
  • एलआयसी किंवा आरबीआय चौकाकडून सेंट्रल एवेन्यू किंवा रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहतुकीमध्येही कुठलाही बदल नसेल
  • सेंट्रल एवेन्यू येथून प्रवास करणाऱ्या आणि रेल्वे स्थानकाकडे जायचं आहे त्यांना पूर्वीप्रमाणेच डावीकडे वळण घेऊन त्यांच्या स्थानी पोहोचावे लागेल

हेही वाचा

Nagpur News: आरटीईअंतर्गत प्रवेश घेऊनही पालकांकडून मागितले प्रवेश शुल्क, शिक्षण विभागाची शाळेवर कारवाई

महत्त्वाच्या बातम्या

Shyamkumar Barve: थट्टा-मस्करीत चापट मारली, प्रतिभा धानोरकर माझ्या बहिणीसारख्या; श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, मुख्यमंत्र्याकडे चौकशीची मागणी करणार
'थट्टा-मस्करीत चापट मारली, प्रतिभा धानोरकर माझ्या बहिणीसारख्या'; श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, मुख्यमंत्र्याकडे चौकशीची मागणी करणार
Nagpur Crime: शेतकऱ्यांच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करुन 'एसबीआय'ला तब्बल 73.82 कोटींचा गंडा; नागपूर पोलीसांकडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, तिघांना अटक
शेतकऱ्यांच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करुन 'एसबीआय'ला तब्बल 73.82 कोटींचा गंडा; नागपूर पोलीसांकडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, तिघांना अटक
Congress: श्यामकुमार बर्वेंनी प्रतिभा धानोरकरांना चापट मारली? दिल्ली रॅलीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल; काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, अनुशासनात्मक कारवाईची मागणी, नेमकं प्रकरण काय?
श्यामकुमार बर्वेंनी प्रतिभा धानोरकरांना चापट मारली? दिल्ली रॅलीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल; काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, अनुशासनात्मक कारवाईची मागणी, नेमकं प्रकरण काय?
Mahavitaran EV Car Agreement: महावितरणचा 'शॉक', राज्यभरातील ईव्ही कार भाडे करारावर गंभीर प्रश्न; निविदेपासून वर्क ऑर्डर निघेपर्यंत मूळ किंमतीत तब्बल 178 कोटी रुपयांची वाढ
महावितरणचा 'शॉक', निविदेपासून वर्क ऑर्डर निघेपर्यंत मूळ किंमतीत तब्बल 178 कोटी रुपयांची वाढ; राज्यभरातील ईव्ही कार भाडे करारावर गंभीर प्रश्न

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Cristiano Ronaldo Retirement : क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, व्हिडिओ जारी करत थेट निर्णय सांगितला...
क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर पण एक स्वप्न अधुरं राहिलं...
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
Embed widget