नागपूर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने कोविड कालखंडानंतर प्रथमच जिल्हास्तरीय ज्युनिअर व सब ज्युनिअर स्पर्धेचे आयोजन ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करण्यात येणार आहे. जवाहरलाल नेहरु हॉकी टुर्नामेंट सोयायटी, नवी दिल्लीच्या वतीने चालू वर्षातील ज्युनिअर व सब ज्युनिअर नेहरु कप हॉकी स्पर्धेचे आयोजन 2 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर या कालवधीत शिवाजी स्टेडियम, नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे.
इच्छुकांसाठी पात्रता निकष
या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यापूर्वी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तर स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हृयातील 15 वर्षाखालील मुले आणि 17 वर्षाखालील मुले व मुली या गटांमध्ये हॉकी स्पर्धेचे आयोजन ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंची जन्मतिथी 15 वर्षे मुलांसाठी 1 नोव्हेंबर 2007 किंवा त्यानंतर असावी. 17 वर्ष मुले व मुलींसाठी जन्मतिथी 1 नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतरची असावी.
Agriculture : शेतीमध्ये बंपर उत्पन्न घ्या, 50 हजार रुपये जिंका; शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा
गुरुवारी सायंकाळी पाचपर्यंत करा अर्ज
या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व शाळा व संघानी संघाच्या प्रवेशिका तसेच स्पर्धा सहभाग शुल्क 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूर येथे जमा करावी. अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक दर्शना पंडीत मो.क्र. 8208576217 यांच्याशी संपर्क साधावा. ज्या संघांनी नोंदणी वेळेत सादर केली नाही, अशा संघांना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही याची नोंद घ्यावी. चालू वर्षात स्पर्धा कालावधीत प्रशासनाकडून कोविडबाबत काही सूचना आल्यास त्यानूसार निर्णय घेण्यात येईल. या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले आहे.