Omicron In Nagpur : मुंबई आणि पुण्यानंतर ओमायक्रॉन या व्हेरियंटने उपराजधानी नागपूरमध्ये शिरकाव केलाय. नागपूर महानगर पालिका आयुक्त राधाकृष्णन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. नागपूरमध्ये 40 वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचं त्यांनी सांगितलं. ओमायक्रोन पॉसिटीव्ह आढळलेल्या 40 वर्षीय रुग्णाचा पश्चिम आफ्रिकेतील प्रवासाचा इतिहास आहे. हा व्यक्ती नागपुरात परतल्यानंतर त्याची कोरोना चाचणीसह जीनोम सिक्वेन्सिंग ही करण्यात आली होती. त्यानंतरच त्याला ओमायक्रोन संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले. या रुग्णाची प्रकृती स्थिर असून तो रुग्णालयात उपचार घेतोय. संबंधित रुग्णाच्या कुटुंबातील इतर सदस्य निगेटिव्ह आले आहेत.त्यांनही विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. संबंधित रुग्णच्या संपर्कातील इतर लोकांची ट्रेसिंग केली जात असून त्यांच्या सर्वांच्या चाचण्या प्रशासनाकडून केल्या जाणार आहेत. चार डिसेंबर रोजी संबधित व्यक्तीचे नागपूर विमानतळावर नमुने घेतले होते. यामध्ये तो कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले होते. जनुकीय चाचणीत (जिनोम सिक्वेन्सिंग) त्याला ओमायक्रॉन असल्याचे निदान झाले आहे. 








राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णाची संख्या 18 वर पोहचली आहे. त्यापैकी 7 जणांना रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. पिपंरी चिंचवडमध्ये दहा, मुंबईत चार, पुण्यात एक आणि डोंबिवलीमध्ये एक ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला होता. मुंबई आणि पुण्यानंतर ओमायक्रॉन व्हेरियंटने नागपूरमध्येही शिरकाव केलाय. दक्षिण आफ्रिकामधून आलेल्या व्यक्तीला ओमायक्रॉन झाल्याचं स्पष्ट झालेय. 


संबधित बातम्या :


Omicron Variant : दिलासा! राज्यातील पहिला ओमायक्रॉनबाधित रुग्ण कोरोनामुक्त
Omicron Variant : दिलासादायक! फायझर लसीचा बूस्टर डोस ओमायक्रॉन व्हेरियंटवर 90 प्रभावी, संशोधनात उघड 
Omicron : ओमायक्रॉन दोन आठवड्यात कुठून कुठपर्यंत पोहोचला? जगाला ओमायक्रॉनचा किती धोका? 
Omicron : ओमायक्रॉनचा वाढता धोका! नव्या प्रकारानं चिंतेत भर...
Omicron Variant : ओमायक्रॉनला रोखण्यासाठी धारावी पॅटर्न पार्ट 2; असं आहे प्रशासनाचं नियोजन


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha