Omicron Variant : कोरोनाचा ओमायक्रॉन (Omicron) भारतातही वेगानं पसरत असल्याचं पाहायला मिळतंय. ओमायक्रॉन व्हेरियंट प्रथम दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळला. आता या प्रकाराबाबत एक मोठी चिंतेची बाब समोर आली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटचे दोन प्रकार आढळल्याचं समोर आलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य अधिकाऱ्याने असा दावा केला आहे. त्यामुळे आता ओमायक्रॉन (B.1.1529) व्हेरियंटचे आता BA.1 आणि BA.2 असे दोन प्रकार आढळल्याचे समोर आलं आहे.

Continues below advertisement


शास्त्रज्ञांनी सांगितले की, ''दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये ओमायक्रॉनच्या नवीन प्रकाराची (BA.2) ची अनेक प्रकरणे आढळून आली असून हा नवीन प्रकार शोधणे अधिक कठीण आहे.'' ओमाक्रॉन व्हेरियंटचा नवीन प्रकार दक्षिण आफ्रिकेतून ब्रिस्बेनला परतलेल्या व्यक्तीमध्ये आढळून आला. या प्रकाराला 'ओमायक्रॉन लाईक' म्हणतात आणि ते शोधणे अधिक कठीण आहे. ओमायक्रॉनचा नवीन प्रकारावर कोरोना लस किती प्रभावी आहे हे अद्याप निश्चित नाही.


तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार अनुवांशिकदृष्ट्या ओमायक्रॉन सारखाच आहे, परंतु दोघांमधील एक महत्त्वाचा फरक म्हणजे नवीन प्रकारामध्ये अनुवांशिक गुणांचा अभाव आहे. अनुवांशिक गुणांच्या अभावामुळे नवीन 'ओमायक्रॉन लाईक' विषाणू ओळखणे अधिक कठीण होईल. सध्या दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये ओमायक्रॉनच्या नव्या प्रकाराचे रुग्ण सापडले आहेत.


ओमायक्रॉनच्या सुरुवातीच्या अभ्यासावरून असे दिसून आले आहे की, ओमायक्रॉन हा डेल्टा पेक्षाही जास्त भयंकर आहे. तो जगभरात वेगाने पसरत आहे. त्यामुळे मृत्यू दरातही वाढ होते. कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या आणि आधीच कोरोना होऊन गेलेल्या लोकांनाही ओमायक्रॉनचा धोका आहे. तज्ञांच्या मते ओमायक्रॉन डेल्टालाही मागे टाकू शकतो.   


इतर महत्त्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha