Omicron Variant :  फायझर (Pfizer) कोविड लसीचा (Covid Vaccination) तिसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस (Booster Dose) कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटवर (Omicron Variant) 90 टक्के प्रभावी असल्याचं एका संशोधनात उघड झाले आहे. यामुळे मृत्यूदर 90 टक्क्यांनी कमी होण्यास मदत होईल, असे इस्त्रायलमध्ये केलेल्या रिसर्चमध्ये समोर आले आहे. 'द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन'मध्ये गुरुवारी प्रकाशित झालेल्या संशोधन अहवालात म्हटले आहे की, या अभ्यासात 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला ज्यांना किमान पाच महिन्यांपूर्वी फायझर लसीचे दोन डोस मिळाले होते.


संशोधनात सहभागी 8,43,208 लोकांचे दोन गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले होते. या गटांपैकी एकामध्ये बूस्टर डोस मिळालेल्या लोकांचा समावेश होता, तर दुसऱ्या गटात बूस्टर डोस न मिळालेल्या लोकांचा समावेश होता. या दोन गटांच्या अभ्यासाच्या निष्कर्षांची एकमेकांशी तुलना करण्यात आली.


क्लॅलिट हेल्थ सर्व्हिस आणि इस्रायलच्या बेन-गुरियन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितले की, अभ्यासात असे दिसून आले आहे की, फायझरच्या कोविड लसीचा बूस्टर (तिसरा) डोस कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकारातील मृत्यू 90 टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो.


जगभरात कोरोना लसीकरण वेगाने सुरु आहे. त्याच वेळी, कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या देखील सतत वाढत आहे. आतापर्यंत जगभरातील कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या 26 कोटी 93 लाख 21 हजार 866 च्या पुढे गेली आहे. तर, कोरोनामुळे आतापर्यंत 53 लाख 10 हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha