नागपूर : नागपूर पोलिसांचे पथक शहरातील विविध मॉल्स आणि कपड्यांच्या दुकानांमध्ये जाऊन चेंजिंग रुम/ट्रायल रूमची तपासणी करणार आहे. चेंजिंग रुममध्ये छुपे कॅमेरे लावलेले नाहीत ना यासंदर्भात ही तपासणी केली जाणार आहे. हे पोलीस साध्या वेशात कधीही ग्राहक बनून दुकानांमध्ये जातील आणि तपासणी करतील. दरम्यान मॉल्स आणि कापड दुकानांमध्ये काम करणाऱ्या सेल्समनचे पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक राहील, अशी माहिती झोन 2 च्या पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.
नागपुरातील सीताबर्डी बाजारातील एका कपड्यांच्या दुकानात चेंजिंग रुममध्ये( ट्रायल रुम) महिला आणि तरुणींचे कपडे बदलतानाचे छुप्या कॅमेराद्वारे चित्रण करण्यात येत असल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणीच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी दुकानाचा मालक आणि एका कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्या दोघांनाही अटक केली आहे.
या संतापजनक प्रकारानंतर नागपूर पोलिसांनी अत्यंत कडक पावले उचलली आहेत. नागपूर पोलिसांचे एक विशेष पथक शहरातील विविध मॉल्स आणि कापड दुकानांमध्ये अचानक जाऊन चेंजिंग रूम किंवा ट्रायल रूमची तपासणी करणार आहे.
चेंजिंग रूम मध्ये छुपे कॅमेरे तर लावलेले नाही ना यासंदर्भात ही तपासणी केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे या पथकातील महिला किंवा पुरुष कर्मचारी ग्राहक वेशात / साधे कपडे घालून विविध मॉल्स आणि कापड दुकानांमध्ये जाणार आहेत.
नागपूर पोलीस शहरातील मॉल्स आणि कपड्यांच्या दुकानातील चेजिंग रुमची तपासणी करणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Aug 2019 03:22 PM (IST)
नागपूर पोलिसांचे पथक शहरातील विविध मॉल्स आणि कपड्यांच्या दुकानांमध्ये जाऊन चेंजिंग रुम/ट्रायल रूमची तपासणी करणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -