नागपूर : नागपुरात सुमारे 500 गुंडांचे नवीन वर्ष पोलीस ठाण्यातच उजाळणार आहे. कारण, नवीन वर्षाच्या स्वागतात या गुन्हेगारांमुळे कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, टोळीयुद्ध भडकून शहर रक्तरंजित होऊ नये यासाठी पोलिसांनी शहरातील सुमारे 500 गुंडांना 31 डिसेंबर ते 1 जानेवारी असे 24 तास पोलीस ठाण्यात डांबून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्याला त्यांच्या परिसरातील सराईत गुंडांची यादी देण्यात आली असून गुंडांना पकडण्याची मोहीम सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे गेल्या वर्षी नवीन वर्षाच्या पहिल्याच रात्री गुन्हेगारांमध्ये टोळीयुद्ध भडकून नागपुरात हत्येच्या तीन घटना घडल्या होत्या. त्यामुळे या वर्षी पोलीसांनी आधीच गुंडांना जेरबंद करण्याचे ठरविले आहे. तसेच आज दिवसभर नागपुरात 50 ठिकाणी नाकाबंदी करुन मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्याना पकडले जाणार आहे. आज संध्याकाळपासून उद्या सकाळपर्यंत 4 हजार पोलिस कर्मचारी आणि 400 पोलीस अधिकारी या बंदोबस्तासाठी रस्त्यावर असणार आहे. नवीन वर्षाचे स्वागत करताना अतिउत्साहात गोंधळ करू नये नाही तर पोलिसी खाक्या अनुभवावा लागेल असा इशारा पोलीसांनी दिला आहे.


हेही वाचा - नागपुरात ट्रकमधून तब्ब्ल चार कोटी रुपयांची सिगारेट लंपास

आज वर्षाचा अखेरचा दिवस असल्याने सर्वजण नवीन वर्षाच्या तयारीत मग्न आहेत. सरत्या वर्षाला निरोप देताना अनेकजण मद्य पिऊन पिताना आढळतात. अशावेळी वाद होण्याची शक्यता अधिक असते. सोबतच मद्य पिऊन वाहन चालवल्याने अपघात होण्याचीही शक्यता वाढते. त्यामुळेच नागपूर पोलीसांना सुरक्षेचा उपाय म्हणून ही कारवाई केली आहे. सोबतच आजची रात्र आणि उद्याचा दिवस मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी हॉटेल, रिसॉर्ट, लॉजेसची बुकिंग आधीच करुन ठेवली आहे. या ठिकाणांवर पोलीसांची अधिक नजर असणार आहे.

हेही वाचा - तिघाडी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, कर्जमाफीवरुन फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

Ajit Pawar | लवकरच खातेवाट होईल आणि खऱ्या अर्थाने नवीन वर्षापासून कामाला सुरुवात होईल : अजित पवार | ABP Majha