नागपूर : शहरापासून जवळ असलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पात ( Nagpur Pench Tiger Reserve) नुकतंच नागरिक-विज्ञानावर आधारित मान्सूनपूर्व आणि उत्तरोत्त सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात आलं असून त्यामध्ये बहुरंगी आणि दुर्मिळ अशा एकूण 170 प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद झाली आहे. हे सर्वेक्षण दोन टप्प्यात घेण्यात आले, ज्यामध्ये पहिल्या सर्वेक्षणात 135 फुलपाखरांची, तर दुसऱ्या सर्वेक्षणात 35 नवीन प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद झाली आहे. विशेषतः या सर्वेक्षणात 15 राज्यातील 126  स्पर्धक सहभागी झाले होते.


आजघडीला देशात 50 हून अधिक व्याघ्र प्रकल्प ( Tiger Reserve) आहेत. मात्र नागपूर शहराच्या (Nagpur City ) परिघात मोठ्या प्रमाणात व्याघ्र प्रकल्प असल्याने नागपूरची टायगर कॅपिटल ऑफ इंडिया ( Tiger Capital of India ) अशी  वेगळी ओळख निर्माण झाली आहे. याच परिसरातील पेचमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं. 


टिन्सा इकॉलॉजिकल फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेचा पुढाकार


'द जंगल बुक’ मधील मोगली या पात्रामुळे पेंच जंगल जागतिक पातळीवर नावारूपास आले आहे. शिवाय देशभरातील व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापनातील कामगिरीचा अहवाल नुसार पेंच व्याघ्र प्रकल्पाला या यादीत 8 वे स्थान मिळाले आहे. तसेच सर्वोत्तम मूल्यांकन प्राप्त करून पेंच व्याघ्र प्रकल्पाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. एकुणात पेंच व्याघ्र प्रकल्प सर्व स्थरातील वन्यजीवांच्या वाढीसाठी पूरक आहे. यांच अनुषंगाने टिन्सा इकॉलॉजिकल फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने नुकताच पेंच व्याघ्र प्रकल्पात नागरिक - विज्ञानवर आधारित मान्सूनपूर्व आणि उत्तरोत्त सर्वेक्षणचे आयोजन करण्यात आले होते. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून अभ्यासपूर्ण माहिती,फुलपाखरांची विविधता आणि घनता यावर आधारित हंगामी डेटा तयार करणे हा या सर्वेक्षणा मागील  मुख्य उद्देश होता. 


सर्वेक्षणादरम्यान पोलार्डच्या चालण्याचा पद्धतीचा अवलं


प्रामुख्याने अश्या प्रकारातील सर्वेक्षण पाश्चात्य  देशांमध्ये केले जाते. वन्यजीवांच्या सर्वांगाने अभ्यास करत असतांना अश्या सर्वेक्षणाचा मोठा उपयोग होत असतो. तसेच भारतातील संरक्षण क्षेत्रात जैवविविधता सर्वेक्षणावरील डेटा संकलनात सहयोग आणि योगदान देण्यासाठी अशा सर्वेक्षणाचा महत्वाची भुमूका असते.या सर्वेक्षणासाठी तांत्रिक सहकार्य टिन्सा इकॉलॉजिकल फाउंडेशन या संशोधनावर आधारित स्वयंसेवी संस्थेच्या वतीने पुरविण्यात आले.टिन्सा टीमने डिझाईन केलेल्या सर्वेक्षणादरम्यान फुलपाखरांच्या विविधतेची नोंद करण्यासाठी पोलार्डच्या चालण्याच्या पद्धतीचा अवलंब केला.  सर्वेक्षणात तीन ते चार अश्या टीममध्ये विभागणी केली असून प्रत्येक संघात एका कुटीचे वाटप केले होते. या सर्वेक्षणात एकूण 42 संघांनी 42 नमुना बिट्स शिबिरांचा समावेश केला.


15 राज्यांमधून 126 स्पर्धाकांचा सर्वेक्षणात सहभाग


पेंच व्याघ्र प्रकल्पात ( Pench Tiger Reserve ) प्रथम मान्सूनपूर्व सर्वेक्षण मार्च 2023 मध्ये घेण्यात आले होते. त्यात 47 नवीन प्रजातीसह 135  फुलापाखरांची नोंद झाली होती. यावेळी घेण्यात आलेल्या या वर्षातील दुसऱ्या सर्वेक्षणात स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ज्यामध्ये 15 राज्यांमधून 126 स्पर्धाकांचा सर्वेक्षणात सहभाग होता. तर त्यात विशेषतः 50 टक्के या महिला होत्या.


कोबो ॲप मध्ये एकूण 7,700 पेक्षा अधिक वैयक्तिक फुलपाखरांच्या नोंदी


या सर्वेक्षणात कोबो ॲप मध्ये एकूण 7,700 पेक्षा अधिक वैयक्तिक फुलपाखरांच्या नोंदी एकत्रित केल्या. ज्यामध्ये 35 नवीन फुलपाखरांसह एकूण 146 प्रजातींची नोंद करण्यात आली होती. कोबो या विनामूल्य ऑफलाइन ॲपवर आधारित कोबा कलेक्टर डेटा संकलित केला गेला. तसेच या ॲपने प्रत्येक दृश्यांची नोंद त्यांच्या भौगोलिक स्थानासह परिपूर्ण माहितीची नोंद केली आहे. 


ही बातमी वाचा: