Nagpur News : नागपूरच्या बेसा-घोगली परिसरात एका फॅक्टरीला भीषण आग लागली आहे. आज 21 फेब्रुवारीच्या सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास ही आग लागली आहे. प्राथमिक माहिती नुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. बेसा परिसरात (Nagpur News)असलेल्या घोगली चौकातील वैद्य इंडस्ट्रीला ही भीषण आग (Fire) लागली असून या इंडस्ट्री मध्ये सॅनिटरी नॅपकिन तयार करण्यात यतात. या आगीत अद्याप कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी, इंडस्ट्रीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.


या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आतापर्यंत आठ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे कसोशीचे प्रयत्न सुरू आहे.      


आठ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल


नागपूरच्या बेसा भागातील घोगली चौकात वैद्य इंडस्ट्री नामक फॅक्टरी असून ही फॅक्टरीमध्ये सॅनिटरी नॅपकिन तयार करण्यात यतात. आज संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास अचानक फॅक्टरीमध्ये आग लागल्याची घटना घडली. अल्पावधीतच आगीने संपूर्ण फॅक्टरीवर ताबा मिळवला आणि आगीचा प्रचंड मोठा लोट दूरवर पसरला. परिसरात अचानक काळे ढग सदृश्य परिस्थिति तयार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. शहराच्या वेशीवर असलेल्या या भागात छोटासा इंडस्ट्रियल एरिया आहे. सोबतच येथे लोकवस्ती देखील असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.


फॅक्टरीला आग लागल्याचे कळताच फॅक्टरीत काम करणाऱ्यांनी कामगारांनी तत्काळ पळ काढला. त्यामुळे या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या आगीमुळे फॅक्टरीतील कच्चा माल आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या घडीला अग्निशमन दलाच्या वतीने आग नियंत्रणात आणण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहे.


या परिसरात छोटा इंडस्ट्रियल एरिया असला तरी परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. त्यामुळे तातडीने अग्निशमन दलाने पाचारण करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केले आहे. सोबतच घटनास्थळी पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे.  पोलिस सध्या नेमकी आग कश्यामुळे लागली याचा तपास करत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या