Nagpur Cyber Froud: सायबर गुन्हेगारांचे जाळे दिवसागणिक वाढत असून नवनवीन युक्त्याच्या माध्यमातून फसवणुकीचे (Froud) प्रकार घडत आहे. असाच एक खळबळजनक प्रकार नागपुरात(Nagpur Crime)उघड झाला आहे. यात सायबर गुन्हेगारांनी (Cyber Froud) तरुण आणि किशोरवयीन मुलांच्या पालकांना फोन करून तुमचा मुलगा बलात्काराच्या प्रकरणात अडकला आहे, त्याच्या सुटकेसाठी तत्काळ रक्कम जमा कारवी लागेल, अन्यथा पुढील कारवाईला समोर जावे लागेल, अशी बतावणी करत पालकांकडून लाखोंची वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशाच एका जागरूक पालकाने 'एबीपी माझा' शी बोलून इतर पालकांची त्यात फसवणूक होऊ नये म्हणून स्वतः सोबत घडलेला सर्व प्रसंग सांगितला आहे.


बलात्कार प्रकरणी सुटकेसाठी उकळले लाखो रुपये     


सायबर गुन्हेगारांनी आपला मोर्चा आता पालकांकडे वळवला असल्याचे चित्र आहे. त्यासाठी त्यांना भीती दाखवत लाखोंची फसवणूक केल्याचे प्रकार सध्या नागपूरच्या सायबर गुन्हेगारी विश्वातून समोर येत आहे. ज्यामध्ये अनेक पालकांना काही अज्ञात व्यक्ती फोन करू तुमच्या मुलाने बलात्कार केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने मित्रांसह मिळून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. आम्ही पोलीस असून तुमच्या मुलाला त्याच्या मित्रांसह अटक केली आहे. तुमच्या मुलाला या प्रकरणातून सोडवायचे असल्यास दहा लाख रुपये द्यावे लागेल. त्याबाबत बोलणी सुरू करण्यासाठी किमान 40 ते 50 हजार रुपये ऑनलाईन पाठवा, असे फोन काही नागरिकांना येत असल्याचे तक्रारी नागपूरातील काही पालकांना केल्या आहेत.


धक्कादायक बाब म्हणजे, या सायबर गुन्हेगारांना फोन केलेल्या पालकाच्या मुलाचे नाव काय, वय काय, तो कुठे राहतो, या बाबतची इत्यंभूत माहिती असते. त्यामुळे अनेक पालक या थापांना घाबरून या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकून त्यांच्याशी पैशाची बोलणी करतात. तर त्यातीलच काहींनी पोलिसांकडे तक्रार देत हे प्रकरण समोर आणले आहे. पोलिसांनी देखील अशा अफवा अथवा फोन कॉलवर विश्वास न ठेवता सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. अशा पद्धतीचा कुठलाही कॉल अथवा कुणी संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यास, त्याची माहिती तत्काळ पोलिसांकडे देण्याचे देखील आवाहन पोलिसांनी केले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. 


चक्क माजी पोलीस महासंचालकाच्या नावाने लुबाडण्याचा प्रयत्न


नुकतेच एका सायबर गुन्हेगाराने चक्क माजी पोलीस महासंचालकांच्या नावाने लुबाडणूक करण्याचा प्रयत्न केला होता. उत्तर प्रदेशच्या आझमगड येथील रहिवासी असलेल्या संतोष कुमार या संशयित आरोपीने माजी पोलीस महासंचालक भूषण कुमार उपाध्याय यांच्या नावाने फेसबुकवर अकाऊंट तयार करून योगेश ताले (43, रा. गरोबा मैदान) यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. योगेशच्या फ्रेंड लिस्ट मध्ये पोलीस महासंचालक हे आधीपासूनच जोडले गेले होते. परंतु, त्यांना परत रिक्वेस्ट आल्याने त्यांनी ती पुन्हा स्वीकारली आणि पुढे त्यांच्यात ऑनलाइन चॅटिंग झाले. नंतर नंबर शेयर होऊन व्हॉट्सॲप वर बोलणे झाले.


दरम्यान, आरोपीने सैन्यात तैनात असलेल्या त्याच्या मित्राची जम्मू-काश्मीरमध्ये बदली झाल्याने त्याच्या घरातील 2 लाखांच्या फर्निचरचे केवळ 85 हजारात देण्याची तयारी दर्शविली. मात्र ही बाब एक बनाव असल्याचे लक्षात येताच योगेशने भूषण कुमार यांना या प्रकरणाची माहिती दिल्याने, आरोपीचे बिंग फुटले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या