Nagpur News नागपूर : घरातील किरकोळ वादातून संतापलेल्या एका व्यक्तीने चक्क आपल्या पत्नी आणि मुलांना एका खोलीत बंद करून गॅस सिलेंडर लीक करत त्यांना जrवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, त्यांच्या पत्नीने वेळीच समयसूचकता दाखवत आरडाओरड करत ही बाब पोलीस (Nagpur Police) आणि नातेवाइकांच्या लक्षात आणून दिल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे. ही थरारक घटना नागपूरच्या कोराडी पोलीस  (Nagpur News) ठाण्याच्या हद्दीतील ओमनगरमधील जगनाडे ले-आऊट भागात घडली आहे. या प्रकरणी आत्मघातकी (Nagpur Crime) प्रयत्न करणाऱ्या पतीला अटक करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. 


गॅस सिलेंडर लीक करून चक्क पत्नी-मुलांना जाळण्याचा प्रयत्न


रंजन गणेशप्रसाद शाव (वय 43, रा. युनिक शैलपुत्री अपार्टमेंट), असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे. तर रंजनच्या पत्नी मीनू (वय 43), त्यांचा 14 वर्षीय मुलगा आणि आठ वर्षीय मुलगी, अशी थोडक्यात बचावलेल्यांची नावे आहेत. प्राथमिक माहितीनुसार, रंजन हे एका को-ऑपरेटिव्ह बँकेत मुख्य लिपिक म्हणून कार्यरत आहे. त्यांचा तापट स्वभाव असल्याने यापूर्वी देखील त्यांचा आपल्या पत्नीसोबत वाद झाला होता. त्यानंतर हा वाद विकोपाल जाऊन रंजन यांनी आपल्या पत्नी मीनूला मारहाण देखील केली होती. मात्र सोमवारच्या दुपारी त्यांच्यात परत एकदा काही कारणातून वाद उफाळून आला. त्यानंतर रंजन यांनी रागाच्या भरात घरातील गॅस सिलेंडरचा पाइप काढला आणि पत्नी मीनू आणि त्यांच्या दोन मुलांना एका खोलीत डांबले. त्यानंतर हातात माचिस घेऊन रंजन यांनी 'तिघांना संपवूनच टाकतो' अशी धमकी दिली. अल्पावधीतच घरभर गॅस पसरला आणि भीतीपोटी मीनू आणि त्यांच्या दोन मुलांनी आरडाओरड सुरू केली. सोबतच आपल्या भावाला देखील याबाबत कळवले. 


प्रसंगावधान राखल्याने टळला मोठा धोका


काही वेळानंतर संपूर्ण इमारतीमध्ये गॅसचा वास येत असल्याने साऱ्यांनी हा वास कुठून येत असल्याचा तपास केला असता मीनू यांनी मदतीसाठी केलेल्या आरडा ओरडचा आवाज इतर  रहिवाशांना आला. त्यांनी तात्काळ रंजन यांचा फ्लॅटकडे धाव घेतली आणि घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर अपार्टमेंटमधील रहिवाशांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली असता, पोलिसांनी अग्निशन विभागाच्या जवानांसह अपार्टमेंटकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने रंजन यांची समजूत काढली आणि शेजाऱ्याच्या मदतीने फ्लॅटमध्ये प्रवेश करून रंजन यांना ताब्यात घेतले. पत्नी मीनू यांनी प्रसंगावधान आणि समयसूचकता दाखवल्याने त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण अपार्टमेंटच्या जीवाला होणार धोका टळला आहे. या प्रकरणी आत्मघातकी प्रयत्न करणाऱ्या रंजन यांना अटक करून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या :