Nagpur News : नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) GMC संलग्न असलेल्या बीएसी नर्सिंग करणाऱ्या मुलींच्या वसतिगृह (Hostel) परिसरात एक अज्ञात युवक मध्यरात्री दोन ते तीन वाजताच्या सुमारास फिरतो आणि हॉस्टेल रुमचे दार वाजवून मुलींना घाबरवत असल्याच्या धक्कदायक प्रकार पुढे आला आहे. काही मुलींनी धाडस करुन या प्रकाराचे चित्रीकरण केले. त्यात हा तरुण 25 ते 30 वर्षे वयोगटातील असल्याचे दिसून येते. विद्यार्थिनींनी वसतिगृह प्रशासनाकडे याची तक्रार दिली अजून मुलींच्या मनात भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. या तरुणाचा शोध सुरु असून त्याच्या अटकेनंतरच उद्देश स्पष्ट होईल.  


तरुण मध्यरात्री मुलींच्या हॉस्टेलमध्ये, मुलींच्या खोलीचे दारही ठोकले 


तो मध्यरात्री मुलींच्या वसतिगृहात फिरतो... मुलींनी हटकले तर चुकून आल्याने सांगतो... हा अज्ञात नेमका कोण आहे? मध्यरात्री असा फिरण्याचा त्याचा नेमका काय उद्देश आहे याचा आता शोध घेतला जात आहे. नागपूरच्या (Nagpur) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संलग्न असलेल्या बीएसी नर्सिंग करणाऱ्या मुलींच्या वसतिगृह परिसरातील ही घटना आहे. 2 फेब्रुवारी रोजी अज्ञात युवक मध्यरात्री दोन ते तीन वाजताच्या फिरत होता, हॉस्टेलमध्ये शिरुन त्याने काही मुलींच्या खोलीचे दार ठोकले. त्यामुळे घाबरलेल्या मुलींनी एकमेकींना उठवलं. एकत्र गोळा झाल्यानंतर काही मुलींनी धाडस करुन त्याचे चित्रीकरण केले. त्यात तो 25 ते 30 वर्षे वयोगटाला तरुण असल्याचे पुढे आले.


इतर वसतिगृहातही असाच प्रकार समोर


या घटनेनंतर मुलींनी या प्रकाराची लेखी तक्रार कॉलेजच्या प्राचार्यांकडे केली. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इतर वसतिगृहात असाच प्रकार पुढे आल्याने प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेत महाविद्यालयाच्या सुरक्षेत असलेल्या जवानांची गस्त वाढवली. सोबतच याची माहिती पोलिसांना देण्यात आली. याशिवाय त्या दिवशी वसतिगृहाच्या दारावर असलेल्या सुरक्षा रक्षकावर देखील कारवाई करण्यात आली आहे.


रात्री अपरात्री फिरणारा तरुण कोण?


मात्र या संपूर्ण प्रकारानंतर मुलींच्या मनात भीती निर्माण झाली. त्यामुळे वसतिगृहात रात्री अपरात्री फिरणारा हा तरुण कोण आहे? त्याचा नेमका उद्देश काय आहे याचा शोध हा आरोपी पोलिसांच्या हातात लागल्यानंतरच कळेल.


VIDEO : Nagpur Girls Hostel : मुलींच्या हॉस्टेलमध्ये मध्यरात्री दार वाजवून घाबरवण्याचा प्रकार



Nagpur News :निवासी डॉक्टरांची खोली आहे की कोंबड्याचे खुरडे; एकाच खोलीत तीन डॉक्टरांची व्यवस्था, नागपुरातील शासकीय रुग्णालयातील स्थिती