Nagpur Crime News : गर्भवती असल्याची माहिती लपवून ठेवणाऱ्या अल्पवयीन मुलीने यू-ट्यूब पाहून स्वत:च प्रसूती करून बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी नागपूरच्या अंबाझरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली आहे. हा प्रकार जेव्हा अल्पवयीन मुलीच्या आईला कळला तेव्हा त्या मुलीला लगेच रुग्णालयात भरती करण्यात आले. सध्या मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, अशा प्रकारे युट्यूवर प्रसूतीचा प्रयत्न करणे हे धोकादायक असून मुलींच्या जीवावर बेतू शकतं असं तज्ज्ञांचं मत आहे.
नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावर ओळख झालेल्या मित्राने अत्याचार केल्यानंतर एक पंधरा वर्षाची मुलगी गर्भवती राहिली. तिने ही माहिती घरच्यांपासून लपवून ठेवली. नंतर युट्यूब पाहून त्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीने स्वत:च प्रसूती करून बाळाला जन्म दिला. प्रसूती झाली तेव्हा ती घरी एकटी होती रात्री आई घरी आली तेव्हा तिला हा प्रकार कळताच मुलीला रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी मुलीच्या आईचा मोबाईल तपासला असता तिने हे धाडस युट्यूब बघून केलं असावं असा पोलिसांचा दावा आहे. मात्र, अल्पवयीन मुलीने अजून तरी याबद्दल पोलिसांना कोणतीही माहिती दिली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट सांगितलं आहे.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामवरून संबंधित मुलगी आरोपीच्या संपर्कात आली. त्यानंतर एक दोन महिन्याच्या चॅटिंगनंतर आरोपी मुलाने मुलीला एका परिसरात बोलावून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. यातूनच ती मुलगी गर्भवती झाली. मात्र, मुलीने जन्म दिलेल्या बाळाचा मृत्यू झाला आहे. मात्र, बाळाचा मृतदेह संशयास्पद ठिकाणी आढळला असल्याने घटनेला नवं वळण आलं आहे.
तज्ज्ञांचं मत काय?
अशा प्रकारे युट्यूबवर प्रसूतीचा प्रयत्न करणे हे धोकादायक असून मुलींच्या जीवावर बेतू शकतं असं तज्ञांचं मत आहे. कारण प्रसूती काळात काही लिटर ब्लड हे मातेच्या शरीरातून बाहेर जातं. तसेच, बाळाची नाळही आईच्या गर्भाशी जुळलेली असते त्यामुळे हा खूप गंभीर प्रकार असून मुलीने एकटीने हे सर्व केलं असावं यावर डॉक्टरांचा विश्वास नाही. तसेच, आपल्याकडे कायदे आहेत पण त्याची नीट अंमलबजावणी होत नसल्याने हे प्रकार घडत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. प्रसूती आणि गर्भपात करणे हे दोन्ही धक्कादायक प्रकार मुलींनी करू नये असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Nagpur : उन्हाचा चटका वाढला, नागपूर पालिकेचा 'हिट अॅक्शन प्लॅन'; 15 मार्चपासून शाळा सकाळी भरवणार