Nagpur News नागपूर : मध्यप्रदेशातून नागपूर बस स्थानकावर आलेल्या एका बसमधून तब्बल 442 किलोग्राम चीज अनालॉग हा चीज आणि पनीर सदृश्य पदार्थ जप्त करण्यात आला आहे.  नागपूरच्या अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने (Food and Drug Administration) ही कारवाई करण्यात आली असून यात 92 हजार रुपये किमतीचा चीज अनालॉग जप्त करण्यात आला आहे. प्राप्त माहिती नुसरा, ही खेप गणेशपेठ बसस्थानकावर पोहचल्यानंतर हिंगणा येथील एका वितरकासह इतर दोन ठिकाणी पोहचवली जाणार होती. मात्र त्यापूर्वीच गुप्त माहितीच्या आधारे एफडीएच्या (FDA) वतीने ही कारवाई करून हे चीज अ‍ॅनालॉग जप्त करण्यात आले. या प्रकरणाची पुढील तपासणी एफडीएच्या वतीने करण्यात येत असून पनीरच्या नावाने संशयित चीज ॲनालॉगचा पुरवठा करणाऱ्यांचा देखील तपास पोलीस करत आहेत. 


बसमध्ये आढळून आला चक्क  442 किलो  'चीज अ‍ॅनालॉग' 


रेस्टॉरंट्स आणि हॉटेलमधील अनेक खाद्य पदार्थांमध्ये चीज आणि पनीरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र शहरात चीज आणि पनीरच्या नावावर बनावट चीज ॲनालॉगचा वापर केला जात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामागील कारण असे की, चीज आणि पनीरच्या नावे बनावट चीज अ‍ॅनालॉग या चीज आणि पनीर सदृश पदार्थांचा सर्रास पुरवठा शहरात केला जात आहे. अशाच एका छुप्या कारवाईचा भांडाफोड करण्यात नागपूर अन्न व औषध प्रशासनाला यश आले आहे. मध्यप्रदेशातून आलेल्या एका बसमध्ये तब्बल 92 हजार रुपये किमतीचा 442 किलोग्राम चीज अनालॉग जप्त करण्यात  एफडीएच्या पथकाला यश आले आहे. इतक्या मोठ्याप्रमाणात होत असलेल्या का संशयित चीज आणि पनीर सदृश पदार्थांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसली तरी या छुप्या कारवाईमुळे सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 


चीज आणि पनीरला स्वस्त पर्याय


खाद्य तेल, दूध पावडर आणि इतर साहित्याचा वापर करून चीज अनालॉग तयार करण्यात येतं. चीज अनालॉग हा चीज आणि पनीर साठी स्वस्त पर्याय आहे. त्यामुळे बहुतांश रेस्टॉरंट्स आणि हॉटेलमध्ये त्याचा मोठ्याप्रमाणात वापर केला जातो. मात्र यात काही भेसळयुक्त पदार्थांचा वापर केल्याने असे पदार्थ खाल्ल्याने त्याच्या मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम देखील होऊ शकतो. सध्या मोठ्या प्रमाणात पकडण्यात आलेल्या या  संशयित चीज आणि पनीर सदृश चीज ॲनालॉग पदार्थांची तपासणी केली जात असून या तपासणीतील अहवाल नंतर त्यातील  सत्य समोर येईल. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून या पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तिचा देखील तपास केला जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या