Nagpur Municipal Corporation Elections 2022 : नागपूर (Nagpur) हे महाराष्ट्र (Maharashtra) राज्याचे उपराजधानीचे शहर असून राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. नागपूर हे भारतातील तेरावे मोठे नागरी क्षेत्र (urban conglomeration) आहे. नागपूर महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील सर्वांत मोठे शहर आहे.  31 मे 1864 रोजी नागपूरमध्ये नगरपालिका (Nagpur Municipal Corporation) अस्तित्वात आली. त्यावेळी सुमारे सहा हजार चौरस मैल (16 हजार चौ. किमी) क्षेत्रफळ असलेल्या नागपूर शहराची लोकसंख्या  82000 होती. या नगरपरिषदेचे 2 मार्च 1951 रोजी महानगरपालिकेत रुपांतर झाले.  त्यावेळी या शहराचे महानगरपालिकेअंतर्गत असलेले क्षेत्रफळ 217. 56 चौ.कि.मी होते आणि शहराची  लोकसंख्या 482304  इतकी होती.  


पहिले महापौर
नागपूर महानगरपालिकेची स्थापना झाली. त्यावेळी  जी. जी. देसाई हे 1 मार्च 1951  ते 3 जुलै 1951 या कालावधीत प्रशासक होते.  त्यानंतर  4 जुलै 1951 ते 10 ऑगस्ट 1952 या काळात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. तर नागपूर महानगरपालिकेचे पहिले महापौर होण्याचा मान मिळाला.  शेषराव वानखेडे यांना. वानखेडे यांनी  24 जुलै 1952 रोजी प्रथम महापौर म्हणून कार्यभार स्वीकारला. ते 14 जानेवारी 1953 पर्यंत महापौर पदी कार्यरत होते. त्यानंतर  वानखेडे यांनी 9 जानेवारी 1954  ते 12 मे 1955 आणि 12 मे 1955 ते 24 जानेवारी 1956  याप्रमाणे सलग दोनवेळा महापौरपद भुषविले. 


1951 साली  नागपूर महापालिका अस्तित्वात आली, त्यावेळी 42 नगरसेवक होते, 70 वर्षानंतर महापालिकेचे क्षेत्र वाढले आणि नगरसेवकांची संख्या 156 पर्यंत पोहोचली.  2017 च्या महानगपालिका निवडणुकीवेळी चार वॉर्डांचा एक प्रभाग होता.  परंतु, महाविकास आघाडी सरकारने 2022 मध्ये फेररचाना करताना तीन वॉर्डांचा एक प्रभाग केला. त्यानुसार आता 52 प्रभाग आहेत. 


महापालिका स्थापन झाली त्यावेळी महापौर आणि उपमहापौरांचा कालावधी एका वर्षाचा होता. महापौरांना त्यांच्याकडे येणाऱ्या अतिथींच्या स्वागतासाठी दरवर्षी तीन हजार रुपये इतका निधी मिळत असे. नव्या कायद्यानुसार अतिथी भत्ता बंद झाला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पाहुणे येत असल्याने अर्थसंकल्पात महापौरांच्या पाहुण्यांसाठी तीन लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे.
 
75 रुपये ते 20 हजार


महापालिकेची निर्मिती झाली तेव्हा एका नगरसेवकास दरमहा 75 रुपये भत्ता मिळायचा. सभेचा भत्ता होता 10 रुपये. आता महापालिकेच्या नगरसेवकास महिन्याला 20  हजार रुपये मानधन मिळते.


पहिल्या महिला महापौर
शेषराव वानखेडे यांना शहराचे प्रथम महापौर तर त्यांची कन्या कुंदाताई विजयकर यांना पहिल्या महिला महापौर पदाचा मान मिळाला.  कुंदाताई यांनी 5 फेब्रुवारी 1996 ते 9  फेब्रुवारी 1999 पर्यंत महापौर होण्याचा कार्यभार सांभाळला.   


गेल्या 15 वर्षांपासून नागपूर महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजपचे 106 नगरसेवक विजयी झाले आणि सगल तिसऱ्यांदा सत्ता राखण्यात भाजपला यश आहे. 
 
महापालिकेतील पक्षीय बलाबल


भाजप – 106 काँग्रेस – 29 बहुजन समाज पक्ष – 10 शिवसेना – 02 राष्ट्रवादी – 01 


नितीन गडकरी आणि देवेंद्र फडवीस यांचे वर्चस्व
नागपूर महानगरपालिकेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याचे वर्चस्व कायम राहिले आहे. या दोन नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या निवडणुका होतात. काँग्रस हा विरोधी पक्ष म्हणून काम पाहतो.