नागपूरः  सूफी संत बाबा ताजुद्दीन (र.अ) यांचा 100 वा वार्षिक ऊर्स ताजाबाद शरीफ येथे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट कार्यालयातून दरबारी शाही संदल काढण्यात आला. संदर ताजाबादच्या बुलंदद्वार येथून निघाल्यानंतर उमरेड रोड, शीतला माता मंदिर, सक्करदरा चौक, अशोक चौकपासून महाल, इतवारी, गांधीबागच्या ज्या मार्गावरुन बाबा ताजुद्दीन आपल्या जीवनकाळात फिरले त्या मार्गाने फिरविण्यात आला. या शाही संदलचे जागोजागी स्वागत करण्यात. तसेच सायंकाळी संदल पुन्हा ताजाबाद येथे पोहोचला. यावेळी हजारोंच्या संख्येत भाविक सहभागी झाले होते. याशिवाय विविध सामाजिक, धार्मिक संघटना आणि राजकीय पक्षांकडून बाबा ताजुद्दीन यांच्या शाही संदलचे स्वागत करण्यात आले.


होणारे कार्यक्रम...


बाबा ताजुद्दीन यांच्या शताब्दी वर्षानिमित्त शुक्रवारी सकाळी दरगाह परिसरात छोटा कुल शरीफ यांच्या फातेहा कार्यक्रम झाला. तसेच रात्री दहा वाजता नातिया मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्या, 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता कुल शरीफ यांची फातेहा होईल. 30 ऑगस्ट रोदी रात्री दहा वाजता ऑल इंडिया नात ख्वानी होणार आहे. 1 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर 3 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय सूफी कॉंन्फरंस होईल. या जगभरातून विविध धर्मगुरु सामिल होणार आहे.


300 सीसीटिव्हीची करडी नजर


यंदा शुक्रवारी अमेरिका येथील भाविकाची चादर चढविण्यात आली. यासोबतच इजराईल येथूनही चादर आली असल्याचे  ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे खान यांनी सांगितले. येणाऱ्या भाविकांच्या राहण्याच्या सोयीसाठी अडीच लाख चौ. फुटाच्या भव्य डोमची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच 750 पोलीस (Police) कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात आहेत. तर सुरक्षेच्या दृष्टीने 300 सीसीटिव्हीची (CCTV) नजर परिसरात आहे . तसेच भाविकांना रेल्वे स्थानक, बस स्थानकावरुन येण्या-जाण्यासाठी मनपातर्फे आपली बसची व्यवस्था करण्यात आली आहे. गरजेनुसार ही बस सेवा देत आहे.


मान्यवरांनी घेतले दर्शन


सूफी संत बाबा ताजुद्दीन यांच्या 100 वा वार्षिक ऊर्स ताजाबाद शरीफ येथे भाविकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत आहे. यासोबतच सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांची श्रद्धा असून सर्वच पक्षातील भाविक आपले पक्ष विसरुन दर्शनाला येत आहे. तसेच यावेळी आयोजित विविध कार्यक्रमातही मान्यवर सहभागी होत आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या


NMC News : सोशल मीडियावर नागरिकांच्या तक्रारी जोमात, मनपा प्रशासन कोमात; एबीपी माझाच्या प्रश्नांवर मनपा प्रशासक राधाकृष्णन यांच्याकडून 'नो रिस्पॉन्स'


Ganesh Chaturthi 2022 : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार, शहरातील तलाव विसर्जनासाठी पूर्णतः बंद