नागपूर :  नागपूरात सुरु असलेल्या आंतरराष्टीय बॅडमिंटन स्पर्धा करिता देश विदेशातून अनेक खेळाडू नागपूर शहरात आले असून या खेळाडूंनी नागपूर मेट्रो प्रकल्पाला भेट देत नागपूर मेट्रोने एअरपोर्ट मेट्रो स्टेशन-खापरी-झिरो माईल फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन पर्यंत मेट्रोने प्रवास केला. ज्यामध्ये भारत, जापान, युगांडा, थायलँड, मालदीवच्या खेळाडूंचा, प्रशिक्षकांचा तसेच या स्पर्धेच्या आयोजकांचा देखील समावेश होता.


भारतीय खेळाडू व मूळची नागपूर शहराची बॅडमिंटन खेळाडू मालविका बनसोड यांनी मेट्रो प्रवास दरम्यान नागपूर मेट्रोचा ब्रँड अँबेसेडर व्हायला मला आवडेल असे प्रतिपादन केले. नागपूर मेट्रो अतिशय स्वच्छ आणि उत्तम असून स्टेशन परिसरातील कर्मचारी अतिशय प्रामाणिकपणे सहकार्य करत असतात, असेही त्या म्हणाल्यात. नागपूर मेट्रोने सर्वगुण संपन्न असा प्रकल्प शहरात तयार केला आहे ज्यामध्ये ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपला आहे.


सिटीझन हँगआउट सेंटरचे आकर्षण


एयरपोर्ट मेट्रो स्टेशन येथील बापू कुटी तसेच परिसरात असलेली सिटीझन हँगआउट सेंटर (लायब्ररी) या ठिकाणी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहे जे सर्वांना आकर्षित करतात. पहिल्यांदा मेट्रो प्रवास करण्याची संधी उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील अन्य शहरामधील मेट्रोने प्रवास केला परंतु आपल्या नागपूरची मेट्रो अतिशय उत्तम आहे, यापुढे नागपुरात कुठेही प्रवास करायचा असल्या मेट्रोला माझे प्रथम प्राधान्य असेल असे मत मालविका यांनी यावेळी व्यक्त केले. जपानच्या बॅडमिंटन प्रशिक्षक सातोको सुयेतसुना (Satoko Suetsuna) यांनी नागतपूर मेट्रो बघून जपान येथील मेट्रो सेवेची आठवण झाल्याचे म्हटले. नागपूर मेट्रो स्वच्छतेच्या बाबतीत अग्रणी असल्याचे त्यांनी सांगितले. थायलंड देशाचे प्रशिक्षक नीतिपोंग सेंगसिला (Nitipong Saengsila) यांनी नागपूर मेट्रो सेवेचे कौतुक केले. मेट्रो स्थानके आणि त्याचे आर्किटेक्चर बघण्या सारखे असल्याचे ते म्हणाले.


आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडूनही कौतूक


मालदीव देशाचे प्रतिनिधित्व करणारे रिश्वान शियाम (Rishwan Shiyam) आणि युगांडा येथून या स्पर्धेत भाग घेण्याकरता आलेले ब्रायन कासिरये (Brian Kasirye) यांनी आपल्या देशात अश्याच प्रकारे मेट्रो सेवा असावी हि अपेक्षा व्यक्त केली. आपल्या प्रवाश्या सुरवातीला खेळाडूंनी एयरपोर्ट मेट्रो स्थानकावरील बापू कुटीचे दर्शन घेतले. बापू कुटी समोर सर्वांनी फोटो देखील काढले. खेळाडूंनी खापरी स्टेशनचे महत्व देखील जाणून घेतले. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात खेळाडूंनी झिरो माईल फ्रिडम पार्क येथील रणगाडा, अँफी थिएटर, स्वातंत्र्य युद्धाची माहिती देणारे फलक, माहिती केंद्र देखील बघितले. आजच्या प्रवासादरम्यान महा मेट्रो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खेळाडू आणि इतरांना प्रकल्पासंबंधी सविस्तर माहिती दिली. महा मेट्रो तर्फे महाव्यवस्थापक सुधाकर उराडे यांनी खेळाडू, प्रशिक्षक आणि आयोजकांचे स्वागत केले.


इतर महत्त्वाच्या बातम्या


...आणि राज ठाकरेंनी नागपुरात पोहोचताच चिमुकल्याचा हट्ट पुरवला, पण आधी दिले 'हे' निर्देश


Nana Patole : 'कोरोनात ताट वाजवायला लावल्याने, देशात अवदसा आली, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची खळबळजनक टीका