नागपूर: राजकीय रणनीतीकर प्रशांत किशोर (Prashant Kishore) यांनी विदर्भ चळवळीला गती देण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. 20 सप्टेंबरला नागपुरात ते विदर्भाशी संलग्न नेत्यांसोबत बैठक घेऊन  आंदोलनाची रणनीती ठरविणार आहेत. त्यानंतर नगापूर कराराच्या 70 व्या वर्षानिमित्त 28 सप्टेंबरला त्यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती विदर्भवादी नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी दिली. स्वतंत्र विदर्भ राज्याचे आंदोलन हे स्केलेबल (प्रमाणानुसार समायोजित), सस्टेनेबल (कायम) आणि स्ट्रक्चर्ड (संरचित) या तीन बाबींवर आधारित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
विदर्भ राज्याची (separate vidarbha state) निर्मिती ही जनतेच्या मनातील इच्छा आहे. पण, भाजपने (BJP) स्वतंत्र विदर्भाची भूमिका सोडल्यामुळे ही चळवळ मागे पडली आहे. येथील नेत्यांमध्ये स्वतंत्र विदर्भाबाबत इच्छाशक्ती जागृत व्हावी, यासाठी रणनीती आखण्यात येणार आहे. नव्याने तयार झालेल्या शेजारील लहान राज्यांची प्रगती वेगाने सुरू आहे. विदर्भासारखा सुजलाम सुफलाम प्रदेश मात्र आजही मूलभूत सुविधांसाठी झगडत आहे.


लहान राज्यांचा विकास सुसाट


नव्याने स्थापन झालेल्या शेजारच्या लहान (News States) राज्यांचे दुप्पट झालेले दरडोई उत्पन्न, वाढलेले सिंचन, आरोग्य सुविधा, शिक्षण, लोकांना सुरक्षितता वाटेल अशी कायदा व सुव्यवस्था, रस्ते, नळाद्वारे पाण्याची व्यवस्था, लोकांचे जीवनमान उंचावणाऱ्या योजना, मुबलक वीज, पर्यायाने वाढलेले रोजगार अशी विविधांगी प्रगती तिथे होते आहे. पण, विदर्भात असे विकासाचे चित्र अजिबात दिसत नाही. विदर्भ महाराष्ट्रातून वेगळा झाल्या शिवाय इथे आर्थिक समृद्धी येणे अशक्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.


मागिल दोन महिन्यांपासून सखोल सर्वेक्षण


गेली दोन-अडीच महिने विदर्भाच्या 11 जिल्ह्यांमध्ये वेगळ्या विदर्भासाठी सखोल अभ्यास आणि सर्वेक्षण करण्यात आले. या टीमने त्यांचा अहवाल  प्रशांत किशोर यांना दिला. वारंवार चर्चा झाल्यानंतर 6 सप्टेंबरला मोजक्या विदर्भवादी पदाधिकाऱ्यांसमक्ष त्यांच्याशी झूम ॲपद्वारे संवादसुद्धा साधण्यात आला. या संपूर्ण वाटाघाटींनंतर प्रशांत किशोर यांनी वेगळ्या विदर्भासाठी रणनीती आखण्याची तयारी दर्शविली आहे. या वातावरण निर्मिताला यश मिळाल्यास आगामी 2024 च्या निवडणूकीत पुन्हा वेगळ्या विदर्भाच्या मागणीचा मुद्दा महत्त्वाचा ठरु शकतो.


इतर महत्त्वाच्या बातम्या


...आणि राज ठाकरेंनी नागपुरात पोहोचताच चिमुकल्याचा हट्ट पुरवला, पण आधी दिले 'हे' निर्देश


Annual Sugar Conference : दोन दिवसीय साखर परिषदेला पुण्यात सुरुवात, शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन, साखर कारखान्यांचा होणार सन्मान