Nagpur Latest News :  हिंगणा तालुक्याच्या इससानी ग्रामपंचायतमधील बहुजन नगरातील सरकारी जागेवरील अतिक्रमीत सुमारे 300 कुटुंबियांना घर असलेले प्लॉट करण्याची नोटीस महसूल विभागाने बजावली आहे. त्यामुळं मोलमजुरी करून जीवन जगत असलेल्या कुटुंबाला घेऊन ऐनवेळी जावे तरी कुठे कसा यक्ष प्रश्न पडला आहे. झोपडपट्टीत सुमारे 300 पेक्षा जास्त मुले 10 वी आणि 12 व्या वर्गाची परीक्षा देत आहे. त्यामुळे आम्हाला किमान मुलांच्या परीक्षा संपेपर्यंत तरी बेघर करू नका अशी आर्त हाक कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी विमला आर यांना भेटून केली आहे. 


या झोपडपट्टीतील कुटुंबांना कोर्टाच्या आदेशाने जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात दिलेल्या नोटीस मध्ये हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत. अतिक्रमण धारकांनी स्वतःहून न हटवल्यास 15 मार्चपासून शासकीय यंत्रणेकडून हटवण्यात येईल असा इशारा देण्यात आल्याचे कुटुंबियांनी संगीतले. शिवसेनेनेचे तालुका प्रमुख रवी जोदांगडे यांनी कुटुंबियांच्या पाठीशी राहून प्रशासना सोबत वेळ पडल्यास दोन हात करण्याची तय्यारी दर्शवली आहे. यात खासदार कृपाल तुमाने हे सुद्धा कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचाही विश्वास तालुका प्रमुख रवी जोदांगडे यांनी व्यक्त केला आहे. यासाठीच आज जिल्हाधिकारी यांना भेटून ही शिवसेने त्या 300 कुटुंबाची व्यथा मांडली. किमान मुलांच्या परीक्षा संपेपर्यंत तरी बेघर करू नकार अशी मागणी निवेदनातून केली.


दोन दशकापासून रहात असताना अचानक कुठे जाणार?
नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील इसासनी ग्रामपंचायती अंतर्गत वार्ड क्रमांक चार मध्ये बहुजन वस्ती आहे. गेल्या 23 वर्षांपासून सुमारे 300 कुटुंब या जागेवर वास्तव्यास आहे. 1991 पूर्वी ही जागा झुडपी जंगल होती. पण कामाच्या शोधात स्थलांतरीत झालेले शेकडो कुटुंबतील किमान एका हजारापेक्षा नागरिक या वस्तीत स्थायीक झाले आहे. ते ग्रामपंचायतला टॅक्स भरत असल्याचे नागरिकांचा दावा आहे. आज पर्यंत कुठलीही नोटीस आली नाही मात्र अचानक जागा खाली करण्याच्या नोटसीने कुटुंबियानी कुठे जाणार असा सवाल प्रशासनाला विचारत आहे.


कोरोनातून सावरलो पण मुलांच्या परीक्षा सुरू असतांना घर खाली करण्याच्या नोटीस वाढवली चिंता...
याच वार्डात सुमारे 21 वर्षांपासून जुन्नीलाल बोपचे कुटुंबासोबत राहतात. कधी गवंडीकाम तर कधी मिळेल ते मोलमजुरीचे काम करून आपल्या संसाराचा गाडा चालवतात. त्यांची मुलगी 12 व्या वर्गात तर मुलगा 10 व्या वर्गात शिकत असून त्यांच्या परीक्षा सुरू आहे. कोरोनाच्या काळात काम बंद असल्याने असली नसली सर्व जमापुंजी खर्च झाली. आता मात्र परीक्षा सुरू असतांना राहत्या घराची जागा खाली करण्याची नोटिस आली. कुठे जावे अशीच परिस्थिती 300 कुटुंबातील असून प्रत्येक घरात किमान एका मुलांची परीक्षा असल्याने प्रत्येक घरातील पालकांची चिंता वाढली आहे.


यात जिल्हाधिकारी विमला आर यांना भेटून कुटुंबियांची व्यथा मांडली. त्यांनी बघतो म्हणत आश्वस्त केले. पण15 मार्चपासून बेघर करण्याच्या कारवाईला सुरूवाट झाल्यास त्याला शिवसेना कसे उत्तर देणार हे पाहावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने जर कठोर पावित्रा घेतल तर हा वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.