Nitin Gadkari : जगातील दहशतवादाचे मूळ हे तेलामध्ये आहे. तेलाच्या व्यवसायातून उभा राहणारा पैसा धर्मांध आणि मूलतत्ववादी लोकांना दिला जात असून, जागतिक पातळीवरील दहशतवादाचे मुख्य कारण तेच असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. नागपुरात गिरीश कुबेर लिखित 'तेल नावाचा वर्तमान' या पुस्तकाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी गडकरी बोलत होते. प्रत्येक धर्मातील जे चांगले, पुरोगामी आणि सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ लोक आहेत, ते यात नाहीत. मात्र धर्मांध लोकं पेट्रो डॉलर्सने पोसले जात असल्याचा आरोपही यावेळी गडकरी यांनी केला.


तेलाच्या अर्थकारणाने संपूर्ण जगात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. चांगल्या विचाराचे देश यात पडत नाहीत. मात्र, काही धर्मांधता मानणारे लोक दहशतवादी कारवायासाठी पेट्रो डॉलरमधून पैसा पुरवतात असा आरोप गडकरी यांनी केला. याच कारणामुळे जगात कट्टर धर्मांध आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणारे उदारमतवादीमध्ये संघर्ष पाहायला मिळतो. जागतिक पातळीवर शांतता आणि स्थिरता निर्माण करायची असेल तर तेलाचे अर्थकारण सुटल्याशिवाय येऊ शकत नाही असेही गडकरी म्हणाले. मात्र, येत्या दहा वर्षात ऊर्जा क्षेत्रातील झालेले बदल पाहता स्थिती बदलेल असा विश्वासही नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.


जागतिक राजकारणामध्ये स्थिरता आणण्यासाठी तेलाच्या अर्थकारणाचा प्रश्न सोडवावा लागेल असेही गडकरी यावेळी म्हणाले. तेलाच्या अर्थकारणामुळे देशाच्या अर्थकारणात अनेक प्रश्न आहेत. शेतकरी केंदरीत करुनच सरकार धोरणे आखत आहे. मी नेहमी शेतकऱ्यांना म्हणतो की, अन्नदादात न होता उर्जादाता व्हा असेही गडकरी यावेळी म्हणाले. गहू, ज्वारी, तांदूळ यामध्ये पैसा नाही उसात पैसा आहे असे गडकरी म्हणाले. तेलाच्या अर्थकारण भारताची भूमिका जगाला दिश देणारे ठरेल असा विश्वासही यावेळी गडकरी यांनी व्यक्त केला. 


येणाऱ्या काळात तेलाच्या भरवश्यावर असलेलं राजकारण संपेल, त्यामुळे जागतीक अर्थकारणात अडचणी येणार नाहीत. येत्या 10 वर्षानंतर पेट्रोल आणि डिझेलचा वापर करणारे लोक कमी दिसतील. प्रदुषण कमी होईल आणि येथील शेतकरी समृद्ध होईल असे गडकरी म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: