नागपूर :  नागपुरात (Nagpur)  मध्यरात्री  ज्या ऑडी कारनं दुचाकीला धडक दिली ती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेचा (Chandrashekhar Bawankule)  मुलगा संकेत याची होती. स्वतः बावनकुळेंनी ही माहिती दिली आहे. दरम्यान अपघातावेळी कारमध्ये संकेत बावनकुळे उपस्थित  होता, पोलिसांनी मान्य केलंय. पोलीस उपायुक्तांनी आज पत्रकार परिषद घेतली. नागपूरच्या रामदासपेठमध्ये घडलेल्या ऑडी कारच्या (Audi Car)  अपघात प्रकरणी पोलिसांनी काल रात्री उशिरा संकेत बावनकुळे याला बोलावून चौकशी केल्याची माहिती आहे.  संकेत बावनकुळे गाडीत होता, तो वाहन चालवणाऱ्या अर्जुन च्या बाजूला बसला होतास अशी माहिती पोलीस उपायुक्त  राहुल मदने यांनी दिली आहे. 


पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार,नागपुरात धडक दिलेल्या ऑडी कारमध्ये तीन लोकं होते. अर्जुन हावरे, रोनित चिंतनवार,  आणि संकेत बावनकुळे बसले होते. संकेत बावनकुळे  देखील त्यावेळी  गाडीत होता, तो वाहन चालवणाऱ्या अर्जुन च्या बाजूला बसला होता. अर्जुन आणि रोनीत या दोघांची वैद्यकीय चाचणी केली आहे.  अर्जुन आणि रोनित हे मद्य प्राशन करून होते.  अर्जुन वाहन चालवत होता, म्हणून अर्जुन हावरेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  सुरुवातीला संकेत बावनकुळे गाडीत होता हे आम्हाला स्पष्ट नव्हते.  मात्र नंतर तपासामध्ये ही बाब समोर आली आहे की, संकेत बावनकुळे गाडीत होता.. अर्जुन आणि रोनीतला ताब्यात घेऊन ये आम्ही जेव्हा चौकशी केली.  तेव्हा त्यांच्या माहितीवरून संकेत त्या गाडीत होता असं माहीत पडलं म्हणून काल रात्री त्याला बोलावून त्याची चौकशी केली आहे.  हे कुठून येत होते याचा तपास केले असून ते लाहोरी हॉटेलमधून होते. तिथे बार ही आहे त्यातून ते मधून येत होते. आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नाही. सीसीटीव्ही  डीलिट  केले हे सत्य नाही,  असे कुठे ही आढळले नाही.  सुरुवातीला लोकांनी जेव्हा अपघात घडले.


जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी : चंद्रशेखर बावनकुळे  


मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास काचीपुरा चौकाकडून रामदास पेठकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात घडला. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी असं आवाहन बावनकुळेंनी केलंय. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या अपघातानंतर काही गंभीर आरोप केलेत. 


हे ही वाचा :


Sushma Andhare: फिर्यादींची सुरक्षितता अतिमहत्त्वाची; संकेत बावनकुळेसह मित्र बसलेल्या बार परिसरातील CCTV... सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?