Nagpur Audi Accident : नागपुरात (Nagpur News) आलिशान ऑडी (Audi Car) गाडीनं दुचाकीला धडक दिली आहे. बरं ज्या भरधाव ऑडीनं अपघात (Nagpur Audi Accident) झाला ती, ऑडी कार एका बड्या राजकीय नेत्याच्या मुलाची असल्याचं समोर आलं आहे. हा बडा राजकीय नेता म्हणजे, भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणजे, चंद्रशेखर बावनकुळे. ज्या आलिशान ऑडीनं अपघात झाला ती ऑडी कार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा संकेत यांची असल्याची माहिती स्वतः बावनकुळेंनी दिली आहे. 


दरम्यान, अपघातावेळी कारमध्ये संकेत बावनकुळे उपस्थित नव्हते, अशी माहिती मिळतेय.  मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास काचीपुरा चौकाकडून रामदास पेठकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात घडला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, असं आवाहन बावनकुळेंनी केलं आहे. नागपुरात सध्या या भीषण अपघातामुळे खळबळ माजली आहे. 


अपघातावेळी संकेत बावनकुळे ऑडी गाडीतच : सुषमा अंधारे 


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मात्र, या अपघातानंतर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अपघातावेळी भरधाव आलिशान ऑडी कारमध्ये संकेत बावनकुळे उपस्थित होते, असा थेट आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. 


सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. अर्जुन हावरे आणि रोहित चिंतमवार या दोघांवर रॅश ड्रयव्हिंगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असताना, हा अपघात झाल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, अपघात घडवणारी ऑडी कार भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कुटुंबाशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे. सध्यातरी पोलीस यासंदर्भात काहीही बोलायला तयार नाहीत, अशी माहितीदेखील समोर येत आहे. 


सुषमा अंधारेंचा थेट आरोप 


नागपुरातील अपघातानं राज्य हादरलं. हा अपघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या भरधाव ऑडी कारनं धडक दिल्यामुळे झाला. आता यावरुन महाविकास आघाडीनं भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे स्वतः चंद्रशेखर बावनकुळेंनी अपघात झालेली गाडी माझ्या मुलाचीच असल्याचं सांगितलं आहे. 


नागपुरात ज्या भरधाव ऑडीनं दोन चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिली. मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास काचीपुरा चौकाकडून रामदास पेठकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे, या गाडीमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा होता, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. 


सुषमा अंधारे म्हणाल्या की, "नागपुरच्या रामदास पेठ येथे घडलेलं हिट अँड रन चे प्रकरण मधील गाडीचा नंबर पोलिसांनी का नोंदवला नाही? माझा थेट आरोप आहे की,  या गाडीमध्ये संकेत बावनकुळे हा चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा अपघातावेळी गाडीत होता. तर ही गाडी प्रताप कामगार यांच्या मालकीची असून गाडीचे मालकही ते आहेत. मात्र, अपघाताच्या वेळी पोलिसांनी गाडी नंबर नोंद करून कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यामुळे या प्रकरणात वेगळा न्याय का दिला? गाडी आणि संबंधित लोकांना पोलिसांनी ताब्यात का घेतले नाही? एका नेत्याच्या मुलाला वेगळा न्याय आणि सर्व सामान्यांना वेगळा न्याय का?"


संकेत बावनकुळेनं ज्या बारमध्ये मद्यपान केलं... : सुषमा अंधारे 


नागपूर हिट अँड रन प्रकरणी सुषमा अंधारे यांनी एक ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये सुषमा अंधारे म्हणाल्या की, फिर्यादी जितेंद्र सोनकांबळे यांची सुरक्षितता अतिमहत्त्वाची आहे. दुसरी महत्त्वाची बाब संकेत बावनकुळे आणि त्याचे 3 साथीदार ज्या लाहोरी बारमध्ये मद्यपान करत होते, त्या बार आणि आसपासचे CCTV फुटेज तात्काळ हस्तगत करायला हवेत."




चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले? 


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "या अपघातातील गाडी माझ्या मुलाच्या नावावर आहे. पोलिसांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी. पोलिसांनी या प्रकरणी कोणालाही वेगळा न्याय देता कामा नये. किंबहुना, जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले पाहिजे. परमेश्वराच्या कृपेने या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही. तर या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी. सीसीटीव्ही फुटेज तपासावे. तसेच याबद्दल मी कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यांशी आतापर्यंत बोललेलो नाही." 


पोलिसांकडून रात्री उशीरा चौकशी 


नागपूरच्या रामदासपेठमध्ये घडलेल्या ऑडी कारच्या अपघात प्रकरणी पोलिसांनी काल रात्री उशिरा संकेत बावनकुळे याला बोलावून चौकशी केल्याची माहिती मिळत आहे. रामदासपेठ मध्ये परवा मध्यरात्री संकेत बावनकुळे यांच्या मालकीच्या ऑडी कारनं दोन कार आणि एका दुचाकीला धडक दिली होती. त्यानंतर ऑडी कार तिथून पळून गेली होती. पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासानुसार संकेत बावनकुळे त्या वेळी कारमध्ये नव्हते. घटनेच्या वेळेला कार अर्जुन हावरे नावाच्या चालक चालवत होता, सोबत रोनीत चितंमवार हा मित्र बसला होता. पोलिसांनी अपघात झाला त्यावेळी रात्री अर्जुन आणि रोनीत या दोघांची वैद्यकीय चाचणी करत, त्यांनी मध्ये प्राशन केलं होतं का? हेही तपासलं होतं.