एक्स्प्लोर

नागपुरात वॉटर पार्कमध्ये पाण्यात डुंबल्यानंतर 36 तरुण-तरुणींची त्वचासंसर्गाची तक्रार

नागपुरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या 56 तरुण-तरुणींचा ग्रुप नागपूरजवळच्या द्वारका वॉटर पार्कमध्ये गेला होता. दिवसअखेर आपल्याला त्वचेचा त्रास झाल्याची तक्रार काही जणांनी केली.

नागपूर : उन्हाळ्यात तुम्ही कुटुंब आणि मित्रांसह वॉटर पार्कमध्ये जाण्याचा बेत आखत असाल, तर थोडी काळजी घ्या. कारण नागपुरातील द्वारका वॉटर पार्कमध्ये संपूर्ण दिवस धमाल केल्यानंतर तीसपेक्षा जास्त तरुणांच्या त्वचेला त्रास झाला आहे. नागपुरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या 56 तरुण-तरुणींचा ग्रुप 28 एप्रिलला नागपूर जवळच्या द्वारका वॉटर पार्कमध्ये गेला होता. सर्वांनी दिवसभर वॉटर पार्कमध्ये विविध राईड्स आणि खेळांचा आनंद लुटला. संध्याकाळपर्यंत धमाल करुन हा ग्रुप नागपूरला परत आला निघतानाच अनेकांना डोळे प्रमाणापेक्षा जास्त लाल झाल्याचं आणि जळजळ होत असल्याचं लक्षात आलं होतं. मात्र आपण पाण्यात जास्त वेळ राहिल्यामुळे असं झालं असावं, हा विचार करुन सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र सर्व तरुण सध्या अभ्यास सोडून एका वेगळ्याच समस्येला तोंड देत आहेत. दुसऱ्या दिवसापासून 56 जणांपैकी 36 तरुण-तरुणींना शरीराच्या विविध भागांवर त्रास व्हायला लागला. कोणाला त्वचेवर पुरळ आली, अंगावर दाणे उठले, तीव्र खाज यायला लागली. तिसऱ्या दिवसापासून संक्रमण झालेल्या ठिकाणी त्वचा सोलून निघू लागल्याने सर्वांनी औषधोपचार सुरु केले. औषधांनी स्थिती नियंत्रणात आल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी संबंधित वॉटर पार्कच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला. मात्र त्यांनी कोणतीच दाद न दिल्यामुळे विद्यार्थ्यांनी स्थानिक खापा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु केला असून आम्हाला पाण्याची गुणवत्ता तपासावी लागेल, असं सांगत सध्या हे प्रकरण चौकशीत ठेवलं आहे. दरम्यान, 'एबीपी माझा'ने या विषयावर द्वारका वॉटर पार्कच्या व्यवस्थापनाशी फोनवर संपर्क केला, तेव्हाही त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्या दिवशी पार्कमध्ये सुमारे बाराशे जणांनी प्रवेश केला होता. मात्र, त्यापैकी फक्त याच एका समूहातील तरुणांना असा त्वचेचे त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी पाण्यातून बाहेर आल्यानंतर नीट आंघोळ केली नसावी, म्हणून त्यांना क्लोरीनच्या पाण्याचा त्रास झाला असावा, असा संशय व्यक्त केला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat and Vijay Waddttiwar: अशोक खरात बड्या सरकारी अधिकाऱ्यांना एकमेकांच्या बायकांशी लैंगिक संबंध ठेवायला सांगायचा, विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा
मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या बायकांचे स्वॅपिंग, लैंगिक संबंध ठेवण्याच्या सूचना, अशोक खरातबद्दल वडेट्टीवारांचा स्फोटक दावा
Nagpur Accident: अपघाताचा महामार्ग! नागपूर जिल्ह्यातील काटोल- वरुड सिमेंट महामार्गाला मोठ्या भेगा, 10 दिवसात दोन दुचाकीस्वरांचा अंत, एक वर्षात 30 अपघातांची नोंद
अपघाताचा महामार्ग! नागपूर जिल्ह्यातील काटोल- वरुड सिमेंट महामार्गाला मोठ्या भेगा, 10 दिवसात दोन दुचाकीस्वरांचा अंत, एक वर्षात 30 अपघातांची नोंद
Prashant Padole Nagpur Accident: काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात, कारला ट्रकची धडक, थोडक्यात बचावले
काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत कारचा चक्काचूर, थोडक्यात बचावले
Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांना प्रश्न, देवेंद्र फडणवीस सुनेत्राताई पवार यांचं नाव घेत म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांना प्रश्न, देवेंद्र फडणवीस सुनेत्राताई पवार यांचं नाव घेत म्हणाले...

व्हिडीओ

Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report
Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report
Ashok Kharat Mobile : मोबाईल 'उघडणार' कोण कोण अडकणार? Special Report
Ashok Kharat and Government Officer : मंत्रालयातले अधिकारी खरातच्या दरबारी? Special Report
Amit Thackeray यांनी घेतली सरवदे कुटुंबाची भेट:मुलांच्या शिक्षणाची घेणार जबाबदारी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Crash : मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
Fairness Cream Alert : गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची वारा आणि पावसामुळं तारांबळ
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची तारांबळ
Credit Score : क्रेडिट स्कोअर प्रत्येक आठवड्यात अपडेट होणार, नव्या नियमाची लवकरच अंमलबजावणी, नेमका काय फायदा होणार?   
क्रेडिट स्कोअर प्रत्येक आठवड्यात अपडेट होणार, नव्या नियमाची लवकरच अंमलबजावणी, काय बदल होणार?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मार्च 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मार्च 2026 | सोमवार
Iran War Live Update: आजवर कोणत्याच देशाला जमलं नाही ते स्पेननं थेट करून दाखवलं; नाटो सदस्य देश असूनही धमक्यांना न घाबरता ट्रम्प यांच्या वाढत्या मनसुब्यांना उधळून लावणारा तगडा निर्णय
आजवर कोणत्याच देशाला जमलं नाही ते स्पेननं थेट करून दाखवलं; नाटो सदस्य देश असूनही धमक्यांना न घाबरता ट्रम्प यांच्या वाढत्या मनसुब्यांना उधळून लावणारा तगडा निर्णय
Ebrahim Zolfaghari: मुस्लिम देशांना अरबीतून, ट्रम्पला इंग्रजीतून अन् इस्रायलला हिब्रूमधून डोळ्यात डोळे घालत जशास तसं प्रत्युत्तर देणारा इराणी जनरल आहे तरी कोण?
अरब राष्ट्रांना अरबीतून, ट्रम्पला इंग्रजीतून अन् इस्रायलला हिब्रूमधून डोळ्यात डोळे घालत जशास तसं प्रत्युत्तर देणारा इराणी जनरल आहे तरी कोण?
PPF, सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याज दरासंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय, नव्या आर्थिक वर्षात किती टक्के व्याज मिळणार? जाणून घ्या
PPF, सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याज दरासंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय, नव्या आर्थिक वर्षात किती टक्के व्याज मिळणार?
Embed widget