Nagpur District Gram Panchayat Election Result Live Update : नागपूर जिल्ह्यातील 236 ग्रामपंचायतींचा निकाल एका क्लिकवर

Nagpur District Gram Panchayat Election Results 2022 Live Updates : नागपूर जिल्ह्यातील 236 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणीला सकाळी दहापासून सुरु झाली आहे.

अक्षय गांधी, एबीपी माझा Last Updated: 20 Dec 2022 04:34 PM
नागपूर जिल्ह्यातील 236 ग्रामपंचायतींपैकी 98 वर भाजपचा झेंडा, कॉंग्रेसच्या ताब्यात 90 ग्रामपंचायतीं

Nagpur District Gram Panchayat Election Result Live Update : प्राप्त आकडेवारीनुसार नागपूर जिल्ह्यातील 236 ग्रामपंचायतींपैकी 98 ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला तर 90 ग्रामपंचायती कॉंग्रेसने काबिज केल्या आहेत. या निवडणूकीत शिंदे गटाला आठ ग्रामपंचायती मिळाल्या तर उद्धव ठाकरे गटाला केवळ दोन ग्रामपंचायतींवर समाधान मानावा लागला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खात्यात बावीस ग्रामपंचायती गेल्या तर अपक्ष आणि इतरांनी सोळा ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या.

Nagpur : हिंगणा तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींपैकी पाच भाजपच्या

Gram Panchayat Election Results 2022 : हिंगणा तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींपैकी पाच ग्रामपंचायतीं भाजपला मिळाल्या आहेत. तर दोन ग्रामपंचायती राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळाल्या आहेत.

Nagpur : उमरेड तालुक्यातील 7 पैकी पाच ग्रामपंचातींवर कॉंग्रेसचा झेंडा

Gram Panchayat Election Results 2022 : उमरेड तालुक्यातील 7 ग्रामपंचायत मध्ये कॉंग्रेसला पाच, भाजपला एक आणि उद्धव ठाकरे शिवसेनेला एक जागा मिळाली आहे.

Nagpur : कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींपैकी 17 ग्रामपंचायतींचे निकाल...

Gram Panchayat Election Results 2022 : कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींपैकी 17 ग्रामपंचायतींचे निकाल हाती. सोळा जागांवर भाजप तर एक जागेवर कॉंग्रेसचा विजय.

Nagpur : काटोल विधानसभा क्षेत्रात 51 पैकी 34 ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच

Gram Panchayat Election Results 2022 : काटोल विधानसभा क्षेत्रात 51 पैकी 34 ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच विजयी झाल्याची माहिती आहे. तसेच मसोद व झिल्पा येथील ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीचा उपसरपंच होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे देण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजय मिळविलेल्या ग्रामपंचायतींमध्ये घुबडी, सिंगारखेडा, आग्रा, आरंभी, जामगाव, खेडी, चिखली, दावसा, गोंडीदिग्रस, वंडली सावरकर, येरला धोटे, ईसापूर खु., पिंपळगाव राउत, मेंढला, थुगाव निपाणी, तिनखेडा, मसोरा, सिंदी, सावंगा, वडेगाव उमरी, राउळगाव, वडविहीरा, आजनगाव, माहुरखोरा, लोहारी सावंगा, कोंढाळसावळी, गरमसुर, खामली, राजनी, मेंडकी, अंबाडा सोनक, वंडली वाघ आदींचा समावेश आहे.

Nagpur : धानला ग्रामपंचायत भाजपचा विजय

Gram Panchayat Election Results 2022 : मौदा तालुक्यातील धानला ग्रामपंचायतीत भाजपचा विजय झाल्याची माहिती.

Nagpur : देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात राष्ट्रवादीची सत्ता!

Gram Panchayat Election Results 2022 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावातील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता आल्याची माहिती.

Nagpur : काँग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्षांचे पती विष्णू कोकड्डे हे सरपंच पदासाठी विजयी

Gram Panchayat Election Results 2022 : सावनेर तालुक्यातील पिपळा डाक बंगला ग्रामपंचायतमध्ये काँग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे पती विष्णू कोकड्डे हे सरपंच पदासाठी विजयी झाले असल्याची माहिती.

अनिल देशमुख यांचे मुळ गाव नरखेड तालुक्यातील वडविहीरा येथे राष्ट्रवादी समर्थीत गट विजयी...
Nagpur District Gram Panchayat Election Result Live Update : नागपूर जिल्ह्यातील अनिल देशमुख यांचे मुळ गाव नरखेड तालुक्यातील वडविहीरा येथे राष्ट्रवादी समर्थीत गट विजयी.
Nagpur : काटोल तालुक्यातील 51 पैकी 30 ग्राम पंचायतीचे निकाल, कोणाची बाजी...

Gram Panchayat Election Results 2022 : काटोल तालुक्यातील 51 पैकी 30 ग्राम पंचायतीचे निकाल हाती लागले असून 22 जागी राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने काबिज केलेल्या ग्रामपंचायतींमध्ये घुबडी, सिंगारखेडा, आग्रा, आरंभी, जामगाव, खेडी, चिखली, दावसा, गोंडीदिग्रस, वंडली खु., येरला धोटे, ईसापूर खु., ईसापुर बु., पिंपळगाव राउत, मेंढला, थुगाव निपाणी, तिनखेडा, मसोरा, सिंदी, सावंगा, वडेगाव उमरी, राउळगाव यांचा समावेश आहे.

Nagpur : कळमेश्वर तालुक्यात सुनील केदार गटाची सरशी...

Gram Panchayat Election Results 2022 : कळमेश्वर तालुक्यातील 23 पैकी 17 ग्रामपंचायतींवर कॉंग्रेसने विजय मिळवला आहे. तसेच एक ग्रामपंचायत शिवसेना, चार ग्रामपंचायत भाजप, एक ग्रामपंचायत ग्राम विकास आघाडीचा विजय झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Nagpur : हिंगणा तालुक्यातील 7 पैकी 3 ग्रामपंचायतींचा निकाल हाती...राष्ट्रवादीच्या गडात भाजपने लावला सुरुंग...

Gram Panchayat Election Results 2022 : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील सात ग्रामपंचायतींपैकी  तीन ग्राम पंचायतींचा निकाल हाती लागला असून तीन पैकी दोन ग्रामपंचायतींमध्ये भाजप आणि एक ग्रामपंचायत राष्ट्रवादी कॉंग्रेसने काबिज केल्याची प्राथमिक माहिती....

Nagpur : नागपूर जिल्ह्यातील आतापर्यंतचा निकाल: भाजप 46 , कॉंग्रेस 4, राष्ट्रवादी, 3 इतर 3

Gram Panchayat Election Results 2022 : नागपूर जिल्ह्यातील 236 ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत लागलेल्या प्राप्त निकालानुसार भारतीय जनता पक्षाने 46 निवडणूका जिंकल्या असून कॉंग्रेसने 4, राष्ट्रवादीने 3 आणि इतर 3 ग्रामपंचातींमध्ये विजयी झाले असल्याची प्राथमिक माहिती.

Nagpur : कुही तालुक्यात तीन कॉंग्रेस आणि एक भाजपचा सरपंच

Gram Panchayat Election Results 2022 : नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमध्ये कॉंग्रेस आणि एक भाजपचा सरपंच विजयी...

Nagpur : कामठी तालुक्यात खापा आणि गुमथीमध्ये भाजपचा विजय

Gram Panchayat Election Results 2022 : कामठी तालुक्यात खापा आणि गुमथी ग्रामपंचायतीत भाजपचा विजय...

Nagpur : काटोल तालुक्यात18 ग्राम पंचायतीचे निकाल...14 जागी राष्ट्रवादी...!

Gram Panchayat Election Results 2022 : काटोल तुलाक्यातील 51 पैकी 18 ग्राम पंचायतीचे निकाल लागले असून 14 जागी राष्ट्रवादी काँग्रेस ने बाजी मारल्याची प्राथमिक माहिती. पांजरा काटे, घुबडी, सिंगारखेडा, आग्रा, आरंभी, जामगाव, खेडी, चिखली, दावसा, गोंडीदिग्रस, वंडली खु., येरला धोटे, ईसापूर खु., ईसापुर बु. या ग्रामपंचातींमध्ये राष्ट्रवादीने विजय मिळवला असल्याची प्राथमिक माहिती.

Nagpur : काटोल तालुक्यातील 51 पैकी 13 ग्राम पंचायतीचे निकाल...

Gram Panchayat Election Results 2022 : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील 51 पैकी 13 ग्राम पंचायतीचे निकाल हाती आले असून 10 जागी राष्ट्रवादी काँग्रेस मिळवल्याची प्राथमिक माहिती आहे. नरखेड तालुक्यातील दावसा ग्राम पंचायत भाजपाकडुन राष्ट्रवादीने हिसकावली. पांजरा काटे, घुबडी, सिंगारखेडा, आग्रा, आरंभी, जामगाव, खेडी, चिखली, चंदणपार्डी, दावसा येथे राष्ट्रवादीची सरशी असल्याची माहिती....

Nagpur : उमरेड तालुक्यात कॉंग्रेसचे अरुण बालपांडे विजयी...

Gram Panchayat Election Results 2022 : नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात कॉंग्रेसचे अरुण बालपांडे, सिर्सी वंदना भुटे, पिपळा प्रशांत पाहुणे हे ठाकरे गटाचे उमेदवार सरपंचपदी निवडून आले असल्याची प्राथमिक माहिती....

Nagpur : मौदा तालुक्यातील खरडा ग्रामपंचायतीत भाजप विजयी

Gram Panchayat Election Results 2022 : मौदा तालुक्यातील खरडा ग्रामपंचायतीत  
भाजप विजयी झाल्याची प्राथमिक माहिती...

Nagpur : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या होम ग्राउंडवर जल्लोष कोणाचा...

Gram Panchayat Election Results 2022 : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा होम ग्राउंड असलेल्या कामठी तालुक्यातील बिना ग्रामपंचायत भाजपचा सरपंच विजयी झाल्याची माहिती. आतापर्यंत तालुक्यातील चारही निकाल भाजपचे बाजूने असल्याची प्राथमिक माहिती...

Nagpur : गुमथळा ग्रामपंचायमध्ये ग्रामविकास एकता पॅनल विजयी...
Nagpur District Gram Panchayat Election Results 2022 Live Updates :  नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील पहिला निकाल आला असून गुमथळा ग्रामपंचायमध्ये ग्रामविकास एकता पॅनल विजयी झाले आहे. भाजप आणि काँग्रेसचे समर्थन असलेल्या या पॅनलने सरपंच पदा सह 8 पैकी 6 जागा जिकल्या...
Gram Panchayat Election Results 2022 : नागपूर जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल...

Nagpur Gram Panchayat Election Results 2022 : नागपूर जिल्ह्यातील एकूण 236 ग्रामपंचायतींपैकी 20 ग्रामपंचायतींचे निकालांची प्राथमिक माहिती मिळाली असून यापैकी निकाल खालील प्रमाणे.



ठाकरे गट शिवसेना  - 0
शिंदे गट - 0
भाजप- 10
राष्ट्रवादी- 2
काँग्रेस- 5
इतर- 3


प्राथमिक माहिती असून यात बदल होऊ शकतात. इतर ग्रामपंचायतींचे निकाल जाणून घेण्यासाठी वाचत रहा...


पार्श्वभूमी

Nagpur Gram Panchayat Election Results 2022 : नागपूर जिल्ह्यातील 236 ग्रामपंचायतचा सहभाग आहे. प्रत्येक तालुका स्तरावर तहसील कार्यालयात मतमोजणी सुरु झाली आहे. मतमोजणीला दहा वाजता सुरुवात झाली. नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीणमधील माहूरझरी व नरखेड तालुक्यातील अंबाडा देशमुख ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली आहे. मात्र या संदर्भातील अधिकृत निकाल आयोगाकडून अद्याप घोषित व्हायचा आहे. ग्रामपंचायतची मतमोजणी संपल्यानंतर सर्व तहसील मधील अधिकृत माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे रात्री उशिरा मिळेल. यासंदर्भातील माहिती वेळोवेळी आपल्याला दिली जाईल...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.