एक्स्प्लोर

नागपूरमध्ये लॉकडाऊनचे उल्लंघन करत मुलाचा वाढदिवस साजरा करणे महागात, पिता-पुत्रांचा बुडून मृत्यू

नागपूरमध्ये लॉकडाऊनचे उल्लंघन करत मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पर्यटन स्थळावर जाणे शेख कुटुंबाला पडले महागात. मोहगाव झिल्पी तलावात शेख कुटुंबातील दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे.

नागपूर : जिल्ह्यात सध्या लॉकडाऊन असून लोकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर निघू नये असे बंधन आहे. मात्र, लोकं लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करत सर्रास बाहेर पडताना दिसत आहेत. मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नागपूर बाहेर असलेल्या पर्यटन स्थळावर जाणे शेख कुटुंबाला फारच महागात पडले. 

कारण तलावाकाठी मुलाचा वाढदिवस साजरा करायला गेलेल्या शेख कुटुंबातील दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अब्दुल असिफ शेख (35 वर्ष) आणि शहबील अब्दुल असिफ (12 वर्ष) या दोघांचा समावेश असून ते दोघे नात्याने पिता पुत्र आहेत. नागपूरच्या टिपू सुलतान चौक परिसरात राहणाऱ्या शेख दाम्पत्याला दोन मुले आहेत. त्यापैकी एका मुलाचा आज वाढदिवस होता. सध्या दुकान, व्यवसाय बंद असल्याने शेख कुटुंबाने लाडक्या मुलाचा वाढदिवस नागपूर शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहगाव झिलपी तलावाच्या काठावर निसर्गरम्य वातावरणात साजरा करण्याचे ठरविले. 

कुटुंब मोहगाव झिल्पी तलावाजवळ पोहोचले. सर्वांनी केक कापून मुलाचा वाढदिवस साजरा केला आणि त्यांनतर पिता पुत्र तलावातील पाण्यात उतरले. मात्र, त्यांचे पाय पाण्यातील गाळात फसल्याने ते पाण्यात बुडाले, हे चित्र पाहून पत्नीही तलावात उतरली आणि समोर जाऊन पती आणि मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करू लागली. त्याच वेळी तलावाच्या काठावर उपस्थित असलेल्या काहींनी हे दृश्य पाहिले. त्यांनी पत्नीला वाचविले. मात्र, अब्दुल आणि शहबीलचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच हिंगणा पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढून ते उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
Nitesh Karale Nagpur MLC Election Result 2026: मतदानापूर्वी पक्षातून हाकललं, कराळे मास्तरांना नागपूर पदवीधर निवडणुकीत 24 हजार मतं पडली, आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया
मतदानापूर्वी पक्षातून हाकललं, कराळे मास्तरांना नागपूर पदवीधर निवडणुकीत 24 हजार मतं पडली, आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया
Nagpur Election Result 2026: नागपूरच्या मतमोजणीत पुन्हा मोठा ट्विस्ट; पोस्टल बॅलेटमध्ये भाजप समर्थक अनिल सोलेंची आघाडी; भाजप-काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना, निकालाची उत्कंठा कायम
नागपूरच्या मतमोजणीत पुन्हा मोठा ट्विस्ट; पोस्टल बॅलेटमध्ये भाजप समर्थक अनिल सोलेंची आघाडी; भाजप-काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना, निकालाची उत्कंठा कायम
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत ट्विस्टवर ट्विस्ट; नागपूर, अमरावती अन् पुणे पदवीधरच्या जागांच्या निकालाची उत्कंठा कायम
विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत ट्विस्टवर ट्विस्ट; नागपूर, अमरावती अन् पुणे पदवीधरच्या जागांच्या निकालाची उत्कंठा कायम

व्हिडीओ

Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
Praful Patel NCP : 'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
राज ठाकरे कर्जतच्या डोंगरात, स्थानिकांशी संवाद; साय डोंगरातील वृक्षतोड जवळून पाहिली, जाहीर सभेतून एल्गार
Raj Thackeray Karjat: राज ठाकरे कर्जतच्या डोंगरात, स्थानिकांशी संवाद; साय डोंगरातील वृक्षतोड जवळून पाहिली, जाहीर सभेतून एल्गार
Pune MLC Election : 6770 मतांचा फरक; विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी, पुणे शिक्षक निवडणुकीत यश मिळाल्यानंतर कौस्तुभ गावडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6770 मतांचा फरक; विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी, पुणे शिक्षक निवडणुकीत यश मिळाल्यानंतर कौस्तुभ गावडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Embed widget