Nagpur News : पावसामुळे आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात  वाढते. आता अशातच एकीकडे पावसाचा जोर वाढत आहे तर दुसरीकडे सततच्या मुसळधार पावसामुळे नागपूरात डेंग्यूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढत्या रुग्ण संख्येचा विचार करता नागपूरात डेंग्यू हा चांगलाच चिंतेचा विषय बनला आहे.


विशेष म्हणजे एकट्या जुलै महिन्यात नागपूरात  डेंग्यूचे 80 रुग्ण आढळले आहे . तर चालू वर्षात रुग्णसंख्या 153 वर पोहचली आहे. फक्त नागरी वस्त्याच नाही तर शासकीय कार्यलय देखील डेंग्यूच्या विळख्यात सापडल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. डेंग्यूचा वाढता प्रकोप पाहता महानगर पालिकेचे आरोग्य अधिकाऱ्यांनी नागपूर जिल्हा परिषदेला भेट दिली. तेथील एकंदरीत परिस्थिती पाहून त्यांना धक्का बसला. अध्यक्ष , उपाध्यक्ष व सभापती यांच्या सर्वांच्या कार्यालयात पथकाला कुलरच्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. तसेच पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मंत्र्याचे बंगले तपासले तर तेथे पण पालिकेच्या पथकाला डेंग्यूच्या अळ्या आढळल्या. 


मागच्या काही दिवसापासून नागपूर मध्ये सतत पाणी कोसळत आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्याने शहरातील उत्तर व पूर्व नागपूर भागात डेंग्यूचा मोठा प्रकोप पाहायला मिळत आहे. जुलै महिन्यात  या भागात डेंग्यूचे 80 रुग्ण आढळले. नागरी वस्त्यातील वाढती रुग्ण संख्या  आधीच नागपूर महानगर पालिका प्रशासयासाठी  चिंतेचा विषय बनला असतांना शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे डेंग्यूचा धोका आणखी वाढला आहे .पालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांच्या जनजागृतीचे काम युद्ध पातळीवर केले जात आहे. मात्र मागच्या 7 दिवसात डेंग्यूचे 44 रुग्ण आढळल्याने नागपूर मध्ये परिस्थिती चिंतेची बनली आहे.


डेंग्यू होण्याची कारणे काय आहेत


- डेंग्यूची लागण एडिस नावाचा मच्छर चावल्याने होते.


- डेंग्यूचे डास स्वच्छ पाण्यात अंडी देतात आणि त्या अंड्यातून एडिस डासांची
उत्पत्ती होते. 


- हा एडिस डास दिवसाला चावतो.


डेंग्यूचा फैलाव होण्याची कारणे कोणती 


- घरात कोणत्याही वस्तूत पाणी साठवून ठेऊ नये.


- कूलनमधील पाणी सतत बदलत राहावे.


- लहान मुलांना आणि वृद्धांना अशा दिवसात अंगभर कपडे घालायला द्यावेत.


- ताप आला तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


- झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.


- घराचा परिसर स्वच्छ ठेवा


- घरातील फिशटँक , फुलदाणी यातील पाणी वेळोवेळी बदला.


- घरात डास येऊ नयेत याकरता खिडक्यांना जाळ्या लावा.


 


इतर महत्वाच्या बातम्या


PMFBY : पंतप्रधान पीक विमा योजनेतील लाभार्थ्यांचे 2700 कोटीचे दावे प्रलंबित, सर्वाधिक प्रलंबित प्रकरणे राजस्थानातील, तर महाराष्ट्रातील 336 कोटींचे दावे प्रलंबित