नागपूर:  नागपूरमध्ये (Nagpur News)  शुल्लक कारणावरुन दलित तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. उपचारादरम्यान दलित तरुणाचा मृत्यू झाला आहे. मारहाण करणाऱ्यांवर अॅट्रासिटीअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.मोटार सायकलने माझ्या गाडीला का धक्का मारला? या कारणावरून मारहाण (Nagpur Crime News)  करण्यात आला होता.  


रामटेक जवळच्या सितापार येथे राहाणाऱ्या तरुणाला रामटेक येथील गडमंदिर रस्त्यावर शुल्लक कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. विवेक विश्वनाथ खोब्रागडे (21) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो आपल्या मित्रासोबत 25 नोव्हेंबरला रामटेक शोभायात्रा पाहण्यासाठी आलेला होता. तेव्हा रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास गडमंदिर रामटेकवरुन मोटार सायकलने डबलसिट घरी परत येण्याकरता निघाले. तेव्हा गड मंदिरवरुन खाली उतरत असताना ररत्यात आरोपी मनीष बंडुजी भारती  (36 वर्ष रा अंबाडा)  आणि  त्याचे मित्रांनी त्यांची मोटार सायकल थांबवून तुमच्या मोटार सायकलने माझा बाईकला धक्का मारली असं सांगून त्याला शिवीगाळ केली.


मारहाणीमुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा वडिलांचा दावा


 घटनेची माहिती मिळताच काही वेळांनी फैजानचा भाऊ तेथे आल्यानंतर मनिष भारतीने त्याच्या गाडीचे नुकसान झाल्याचे सांगून फैजानच्या भावाकडून दहा हजार रुपये घेतले. फैजान आणि विवेक यांनी घाबरून पोलीस स्टेशन रामटेकला तक्रार देण्यासाठी न जाता घरी गेले. पण आरोपींच्या मारहाणीमध्ये विवेक गंभीर जखमी झाला होता. त्यांच्या मारहाणीमुळे  माझा मुलगा मरण पावाला अशी तक्रर वडील विश्वनाथ यांनी केली आहे. 


नाशिकमध्ये धारधार शस्त्राने भोसकून खून 


नाशिकच्या म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका इसमाचा धारधार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे. मद्यधुंद टोळक्याने लुटमारीच्या उद्देशाने खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रविदत चौबे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. वायूसेनेतून सेवा निवृत्त झालेले चौबे  एका हॉस्टेलमध्ये चिफ वार्डन पदावर कार्यरत होते. कुटुंबासह जात असताना वाहनांवर दगडफेक  करणाऱ्यांना हटकले असता रागाच्या भरात धारधार शस्त्राने भोसकून खून केल्याची प्राथमिक आहे. या प्रकरणात दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.मद्यधुंद टोळक्याने लुटमारीच्या उद्देशाने खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे.  


हे ही वाचा :


 अंगणात खेळत असणाऱ्या 5 वर्षीय दोन बालकांना घरात नेलं, पॉर्न व्हिडीओ दाखवले अन् लैंगिक अत्याचार केला; पुण्यातील घटना