Nagpur Crime नागपूर : सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Dr. At Babasaheb Ambedkar International Airport) सोन्याच्या तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. गोपनीय माहितीच्या आधारावर ही कारवाई (Nagpur News) करण्यात आली. यात एअर इंटेलिजन्स युनिटच्या पथकाने शारजाह वरुन येणाऱ्या विमानातील प्रवाश्याकडून तस्करीच्या उद्देशाने आणलेले सोन, आयफोन, आणि केसर जप्त केले आहे. मोहमद मोगर अबास असं अटक करण्यात आलेल्या तस्कराचे (Crime) नाव आहे. अंतर्वस्त्रात त्यानं हे सोनं लपवलं होतं. गुप्त महितीच्या आधारे संशयित प्रवाश्याची तपासणी केली असता, त्याच्या कडून एकूण 77 लाख 28 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 


5 आयफोन, 7 स्मार्ट वाच, 8 किलो केसरसह  सोने जप्त


नागपूर विमानतळ सोन्याच्या तस्करीसाठी आता हब होऊ लागले आहे का, अशी शंका येऊ लागली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून नागपूर विमानतळावर सोन्याची तस्करीच्या घटना सातत्याने उघड होत आहे. अशीच एक कारवाई 1 जानेवारी 2024 ला कस्टम आणि डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यु इंटेलिजन्स यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर विमानतळावर करण्यात आली होती. ज्यामध्ये  एका प्रवाशाकडून तब्बल दोन किलो सोने जप्त करण्यात आले होते. शारजहा ते नागपूर येणाऱ्या एअर अरेबियाच्याच्या विमानात रामटेके नावाचा प्रवासी आपल्या सामानासह प्रवास करीत होता. त्याने कंबरेच्या पट्ट्यात सोन्याची छडी चपटी करुन आणली होती. दोन्ही विभागांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली होती. 


त्यानंतर केरळमधील रहिवासी असलेल्या एका प्रवाशाने देखील असाच एक प्रयत्न केला होता. 25 जानेवारीच्या पहाटे कतार एअरवेजच्या फ्लाइट क्र.क्यू आर 590 या विमानानं प्रवास करत नागपूर विमानतळावर आलेल्या या प्रवाशाने छुप्या मार्गाने अंतर्वस्त्रात 549 ग्रॅम वजनाचे  सोनं आपल्या सोबत आणले होते. कस्टम पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली होती. यात तस्करी करणाऱ्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करत यात 34 लाख रुपये किमतीचे सोने जप्त केले होते. चौकशी दरम्यान तस्करानं शारजा इथून हे सोनं तस्करी करून आणले असल्याचे कबूल केले होते. 


 77 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त 


या घटना ताज्या असतांना आता परत एकदा सोन्याची तस्करी करणाऱ्या तस्कराचा प्रयत्न राज्य सीमा शुल्क विभागानं हाणून पाडला आहे. यात प्रवाशाने पॅन्टमध्ये 50 लाख रुपये किमतीचे 830 ग्रॅम सोनं जप्त 6 लाख रुपयांचे 5 आयफोन, 7 स्मार्ट वाच आणि 8 किलो केसर जप्त केले आहे. विशेष बाब म्हणजे, मागील घटनांप्रमाणे या घटनेमध्ये देखील प्रवाशी हा शारजाह वरुन येणाऱ्या विमानातील प्रवाशी आहे. यात तस्करीच्या उद्देशाने आणलेला एकूण 77 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून संशयित आरोपीची पोलिस कसून चौकशी करत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या