Heat Wave Action Plan : राज्यात हळूहळू उन्हाचा चटका वाढू लागला आहे. राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा (Temperature) पारा वाढला आहे. वाढता उन्हाचा प्रकोप लक्षात घेता नागपूर महानगर पालिकेने (Nagpur Municipal Corporation) 15 मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त बी राधाकृष्णन (Municipal Commissioner B Radhakrishnan) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागपूर महापालिकेने (Nagpur Municipal Corporation) आपला हिट अॅक्शन प्लॅन तयार केला असल्याचे आयुक्त बी राधाकृष्णन म्हणाले.
पालिकेचा हिट अॅक्शन प्लॅन तयार
हवामानशास्त्र विभागानुसार यंदाचे वर्ष एल निनो प्रभावित राहणार आहे. त्यामुळे येणारा उन्हाळा अधिकच तापणार असल्याचे संकेत दिसत आहेत. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेने वेळेत पावलं उचलत आपला हिट अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार पालिकेचे सर्व रुग्णालय सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सर्व्हे करुन उष्णतेची झळ पोहोचणाऱ्या वस्त्यांना आणि तेथील नागरिकांचा शोध घेऊन त्यानुसार नागपूर महानगर पालिकेकडून ORH चा पुरवठा केला जाणार आहे. सोबतच शहरातील उद्याने दुपारी पण उघडी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन
दरम्यान, महापालिका गरजेनुसार काही भागात नागरिकांचा उन्हापासून बचाव व्हावा यासाठी शेड नेट तयार करणार असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले. पालिकेने आपला हिट ऍक्शन प्लान तयार केला आहे. यावर्षीचा कडक उन्हाळा बघता पहिल्यांदाच हिट ऍक्शन प्लॅन तयार करताना पालिकेने व्हीजीएनआयटी आणि हवामान विभागाची मदत घेतली आहे. तीव्र उन्हाळ्यात डीहायड्रेशन होण्याची शक्यता असते. त्या पार्श्वभूमीवर पालिकेने खबरदारी घेतली आहे. तसेच उन्हाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना केल्याची माहिती आयुक्त पालिका आयुक्त बी राधाकृष्णन यांनी दिली.
राज्यात यावर्षी तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज
यावर्षी राज्यातील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मार्च ते मे महिन्या दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून जाहीर केली आहे. मागील काही वर्षात तापमानात होत असलेली वाढ चिंतेचा विषय ठरतोय. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात पारा चाळीशी जवळ पोहोचला होता. फेब्रुवारी महिना हा गेल्या 147 वर्षातला सर्वात उष्ण महिना ठरला. पुढील तीन महिने देखील असेच तापदायक राहतील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. मार्च ते मे महिन्यांदरम्यानगुजरात ते पश्चिम बंगाल पट्ट्यात उष्णतेच्या लाटा थडकतील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: