नागपूर : राज्यात रस्ते आणि खड्डे हे समीकरण काही नवीन नाही. अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरक्ष: चाळण झाल्याचे पाहायला मिळते. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडतात यामुळे निरपराध जनतेचा बळी जातो. अशात आजकालची तरुण मंडळी नीट गाड्या चालवत नाहीत. तरुणाई अनेक वाहतूक नियमांचं सर्रास उल्लंघन करताना दिसते. यामध्ये सिग्नल तोडणे आणि दारू पिऊन गाडी चालवणे हे नियम समाविष्ट आहेत. दारू पिऊन गाडी चालवल्याने चालकानी अनेकदा जीव गमावला आहे. असाच एक अपघात आता नागपूरमध्ये घडल्याचं समोर आलंय.
नागपूरमध्ये एक विचित्र अपघात घडला आहे. रस्त्याच्या कडेला बाकावर बसलेल्या आपल्याच तीन मित्रांना एका कार चालकानं चिरडल्याची धक्कादायक घटना नागपुरातल्या सावनेरमधील दादाजीनगर कॉर्नरवर घडली आहे. या विचित्र अपघाताची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. आंध्र प्रदेशातून आलेली ही मंडळी मद्यप्राशन आणि जेवणासाठी ढाब्यावर थांबली होती. जेवण झाल्यावर तीन मित्र बाकावर बसले तर एकजण कार मागे घेत होता. यावेळी कारवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला आहे.
कार चालकाने दारुच्या नशेत कार पाठीमागे घेताना ब्रेकऐवजी एक्सिलेटरवर पाय पडल्यानं हा विचित्र अपघात घडला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, एका टपरीच्या बाजूला तीन जण बाकड्यावर बसले आहेत. यावेळी एक कार चालक गाडी मागे घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र गाडी अचानक वेगाने मागे येते. वेगाने मागे येणाऱ्या गाडी बाकावर बसलेल्या व्यक्तींच्या दिशेने येते. यावेळी गाडी वेगाने येताना पाहून एक व्यक्तीने लगेच तिथून जीव वाचवत बाजूला झाला. मात्र इतर दोघे जण गाडीखाली चिरडले गेले. ही दुर्घटना सीसीटीव्ही चित्रीत झाली आहे.
या विचित्र अपघातात एक जण गंभीर जखमी तर दुसरा जण किरकोळ झाला आहे. धक्कादायक म्हणजे घटनेनंतर कारचालक जखमी व्यक्तीला घेऊन अज्ञातस्थळी निघून गेला या घटनेची पोलिसांकडे कुठलीच नोंद नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
- Golden Temple : सुवर्ण मंदिरातील धक्कादायक प्रकार, तरुणाकडून दरबार साहिब येथील नियमांचा भंग, जमावाच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू
- Omicron : देशात ओमायक्रॉनचं वाढतं संकट, बाधितांची संख्या 145 वर
- Good Bye 2021 : Squid Game सह 'या' कोरियन वेब सीरिजने गाजवलं वर्ष
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha