Kdramas of The Year : जगभरात कोरियन वेब सीरिज (Web Series) सध्या चांगल्याच लोकप्रिय होताना पाहायला मिळतायत. यावर्षी नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित झालेली कोरियन वेब सीरिज 'स्क्विड गेम' (Squid Game) चांगली गाजली. 2021 मध्ये अनेक देशात कोरियन वेब सीरिज (Korean Drama) आणि चित्रपटांचा (Korean Movie) चाहता वर्ग वाढला आहे. यावर्षी स्क्विड गेम सह हेलबाऊंड (Hellbound) आणि विन्सेंझो (Vincenzo) सारख्या सीरिजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या.


स्क्विड गेम (Squid Game) : 2021 मध्ये आलेल्या स्क्विड गेमने नेटफ्लिक्सवरील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या मालिकेचा परिणाम असा झाला की शेअर बाजारापासून ते ऑनलाइन बाजारापर्यंत त्याचा परिणाम दिसून आला.


हेलबाऊंड (Hellbound) : 'हेलबाऊंड' या19 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या कोरियन वेब सीरिजने लोकांना वेड लावले आहे. यामध्ये एका विद्यार्थ्याची  कथा दाखवण्यात आळी आहे जो गुन्हेगारीच्या जगात प्रवेश करतो. पण त्याचे हे रहस्य त्याच्या मित्राला माहीत असते. नेटफ्लिक्सची ही सीरिज खूप लोकप्रिय झाली आहे आणि लोकांना ती खूप आवडली आहे.


माय नेम (My Name) : कोरियन क्राईम थ्रिलर 'माय नेम' बेस सीरिजनेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ही कथा एका तरुण मुलीची आहे, जिला आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घ्यायचा आहे.


विन्सेंझो (Vincenzo) : विन्सेंझो ही नेटफ्लिक्सवरील कोरियन वेब सीरिज माफियाभोवती फिरते. त्याला सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार मिळाला आहे. मालिकेतील कलाकारांची केमिस्ट्री सर्वांनाच आवडली आहे.


लव्ह अलार्म 2 (Love Alarm 2) : 'लव्ह अलार्म 2' हा तब्बल 4 वर्षांनंतर आलेला 'लव्ह अलार्म' (Love Alarm) या मालिकेचा दुसरा सीझन आहे. हाच गुंतागुंतीचा लव्ह ट्रायअँगल (Love Triangle) यात दाखवण्यात आला आहे.


होमटाऊन चा-चा-चा (Hometown Cha-Cha-Cha) : 'होमटाऊन चा-चा-चा' ही रोमँटिक कोरियन वेब सीरिज आहे. ही वेब सीरिज दक्षिण कोरियन चित्रपट 2004 साली आलेल्या मिस्टर हाँग (Mister Hong) चित्रपटाचा रिमेक आहे.


नेव्हरदलेस (Nevertheless) : नेव्हरदलेस ही दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आयुष्याभोवती फिरणारी वेब सीरिज आहे. ज्यांना गंभीर नात्यापासून दूर राहायचे आहे परंतु ते एकमेकांकडे आकर्षित होतात.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha