Omicron in India : देशात ओमायक्रॉनचं संकट वाढतच असल्याचं पाहायला मिळतंय. कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट (Omicrin Variant) देशात हातपाय पसरू लागला आहे. भारतातील ओमायक्रॉनग्रस्तांची संख्या वाढून 145 वर पोहोचली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आणि सरकारसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. तसेच जगभरातही ओमायक्रॉन व्हेरियंट वेगाने पसरत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेसह (South Africa) ब्रिटेन (Britain) आणि युरोपमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.


महाराष्ट्रात सर्वाधिक ओमायक्रॉनबाधित
देशात महाराष्ट्रात सर्वाधिक ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत. शनिवारी ओमायक्रॉनच्या आठ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ही 48 वर पोहोचली आहे. शुक्रवारी सापडलेल्या आठ रुग्णांपैकी साताऱ्यात तीन, मुंबई विमानतळावरील सर्वेक्षणात चार तर पुण्यात एक रुग्ण सापडले आहेत. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील ओमायक्रॉनच्या एकूण 48 रुग्णांपैकी मुंबई येथे 18, पिंपरी चिंचवड येथे 10, पुणे ग्रामीण येथे 6, पुणे मनपा क्षेत्रात 3 कल्याण डोंबिवली येथे 2, उस्मानाबाद 2, बुलढाणा 1, नागपूर 1, लातूर 1 आणि वसई विरार येथे 1 अशा रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 28 रुग्णाांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.


भारतातील एकूण ओमायक्रॉनग्रस्तांची संख्या - 145



  • महाराष्ट्र - 48

  • दिल्ली - 22

  • तेलंगणा - 20

  • राजस्थान - 17

  • कर्नाटक - 14

  • केरळ - 11

  • गुजरात - 07

  • उत्तर प्रदेश - 02

  • आंध्र प्रदेश - 01

  • चंदीगड - 01

  • तामिळनाडू - 01

  • पश्चिम बंगाल - 01



महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha