Nagpur Accident : नागपूरमधील (Nagpur) बुटीबोरी इथं वर्धा रोडवरील वाय पॉईंटवर कार उड्डाणपुलावरून खाली कोसळल्याची (Car Accident) घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे तर दोन प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
चालकांचे कारवरचे नियंत्रण सुटल्याने अपघात
कार वर्ध्यावरुन येत असताना चंद्रपूरच्या दिशेने वळण घेताना चालकांचे कारवरचे नियंत्रण सुटल्याने कार सुरक्षा कठडा तोडून 20 फुटांवरुन खाली कोसळली आहे. बुटीबोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमींना नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
राज्यात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ
गेल्या काही दिवसापासून राज्यात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यामध्ये मृत्यूचं प्रमाण देखील वाढलेलं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक कारणांमुळं अपघात होत आहेत. अनेकवेळा चालक मद्यपान करुन वाहन चालवत असतात, अशा वेळी मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडत आहेत. तर अनेक अपघातात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं अपघात होत आहेत. दरम्यान, वाहन चालवताना चालकांनी योग्य ती खबरदारी घेणं देखील गरजेचं आहे. अन्यथा मोठा धोका होण्याची शक्यता असते. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 3 वर्षांत म्हणजेच 2022 ते 2024 या कालावधीत राज्यात एकूण 95,150 रस्ते अपघात झाले आहेत. यामध्ये सुमारे 41,612 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. राज्य परिवहन विभागाने (RTO) ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये 45 युनिटच्या माध्यमातून आकडेवारी समोर आली आहे, ज्यामध्ये मृत्यूचे प्रमाण हे साधारण 43.73 टक्के आहे. मुंबईमधील आकडेवारी पाहिली तर, 2024मध्ये मुंबई आणि उपनगरीय क्षेत्रात 4,935 रस्ते अपघात झाले आहेत. यामधील 2, 319 रस्ते अपघातांची नोंद ही फक्त मुंबईत झाली आहे. मुंबईकरांसाठी ही आकडेवारी धक्कादायक आहे. तर, मुंबई महानगर प्रदेशात झालेल्या अपघातांमध्ये 1,108 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, या कालावधीत राज्यामध्ये तब्बल 32,801 रस्ते अपघातांची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातांमध्ये 13, 823 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, या आकडेवारीमधून राज्यातील 64 टक्के मृत्यू हे दुचाकीवर स्वार असणाऱ्या मागे बसलेल्या लोकांचेच होतात, असे निदर्शनास आले. तसेच त्यापैकी 80 टक्के प्रकरणात विना हेल्मेटचे असल्याचे समोर आले.
महत्वाच्या बातम्या:
Vadodara Car Accident: 100 च्या स्पीडने कार ठोकली, एकाचा जीव घेतला, धनिकपुत्र अपघातानंतर पुटपुटत राहिला; ओम नम: शिवाय, अनदर राऊंड निकिता