एक्स्प्लोर

मद्यधुंद महिलेच्या मर्सडिजने 2 जणांचा जीव घेतला, अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Nagpur Accident Bail Update : तीन महिन्यापूर्वी मद्यधुंद अवस्थेत कार चालवून दोघांचा बळी घेणाऱ्या  ऋतिका ऊर्फ रितू मालू  यांचा अटकपूर्व जामीनअर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

Nagpur Accident Bail Update : तीन महिन्यापूर्वी मद्यधुंद अवस्थेत कार चालवून दोघांचा बळी घेणाऱ्या ऋतिका ऊर्फ रितू मालू यांचा अटकपूर्व जामीनअर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या प्रकरणी मालू यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 25 फेब्रुवारी 2024 रोजी मध्यरात्री नागपूरच्या रामझुला ओहरब्रिजवर एक महिलेच्या बेजबाबदारपणामुळे दुचाकीवरील दोन तरुणांचा बळी गेला. या घटनेत काळ्या रंगाच्या मर्सडिजमध्ये असलेल्या ऋतिका हिने मद्यधुंद अवस्थेत अंत्यत वेगात रॅश ड्राईव्ह करत दुचकीला धडक दिली. यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नागपुरातील रामझुला पुलावर अपघाताची ही घटना २५ फेब्रुवारी 2024 रोजी रात्री घडली होती. रितू मालू व त्यांची मैत्रीण माधुरी सारडा या दोघी सीपी क्लबमध्ये गेल्या होत्या. तेथे त्यांनी मद्य प्राशन केले. त्यानंतर मर्सिडीज कारने दोघी वर्धमाननगरकडे जायला निघाल्या. रामझुला पुलावरवर रितू यांनी कारचा वेग वाढवला आणि दोन तरुणांच्या मोपेडला जोरदार धडक दिली. यात मोहम्मद हुसेन  व मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तहसील पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून रितू यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केल्यावर तेव्हा न्यायालयाने रितू मालू यांना अंतरिम जामीन दिला होता. पण पुढे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपघाताचा सखोल तपास करत नागपूर पोलिसांनी रितू मालू यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल होता. मात्र अटक टाळण्यासाठी त्यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केला होता. त्याला न्यायालयाने अंतरिम मंजुरी दिली होती. तेव्हापासून त्यावर सुनावणी सुरू होती. आज याप्रकरणी मालू यांचा जामीन फेटाळण्यात यावा, असा जोरदार युक्तिवाद सरकारी पक्षाच्या बाजुने करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून मालू यांचा जामीन फेटाळून लावला आहे. 

भरधाव करने घेतला दोन तरुणांचा बळी

बेजबाबदारपणामुळे दुसऱ्यांच्या जिवाचीही पर्वा न करता भरधाव करने दुचाकीवरील दोन तरुणांचा बळी घेतला. ही दुर्दैवी घटना 25 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घडली. मोहम्मद हुसेन गुलाम मुस्तफा (34, रा.नालसाहब चौक) आणि  मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया (34, रा. जाफरनगर, अवस्थी चौक) असे मृतांची नावं आहेत. तर माधुरी शिशिर सारडा (37, वर्धमान नगर) आणि रितिका ऊर्फ रितू दिनेश मालू (39, रा.देशपांडे ले-आउट) अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. हुसेन आणि त्याचा मित्र आतिफ हे दोघे आपल्या दुचाकीने घरी जात होते. दरम्यान, त्या रात्री दीड वाजताच्या सुमारास हे दोघे रामझुल्यावरून जात असताना एका मर्सडिज कारने (कार क्रमांक. एमएच 49 एएस 6111) त्यांना मागून धडक दिली. या कारचा वेग इतका जास्त होता की, दोन्ही दुचाकीस्वार अनेक फूट दूर फेकले गेले. दरम्यान हुसेन आणि आतिफ हे दोघे गंभीररित्या जखमी झाले. त्यानंतर घटनास्थळावरील लोकांनी तत्काळ या दोन्ही जखमींना जवळच असलेल्या मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मोहम्मद हुसेनला उपचार सुरू करण्यापूर्वीच मृत घोषित केले, तर मोहम्मद आतिफचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग! विदर्भासाठी पुढील 15 दिवस महत्वाचे, नेमकी कशी असणार पावसाची स्थिती? हवामान विभागाचा अंदाज काय?
शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग! विदर्भासाठी पुढील 15 दिवस महत्वाचे, नेमकी कशी असणार पावसाची स्थिती? हवामान विभागाचा अंदाज काय?

व्हिडीओ

Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget