नागपूर: एकमेकांच्या प्रेमात आंधळे (Blind Love) झालेले अल्पवयीन प्रियकर जोडपे लग्न (couple run away for marriage) करण्यासाठी घरातून पळून गेले, मात्र ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांना संशय आला. त्यानंतर टीटीईच्या (TTE) मदतीने या दोघांना नागपूर स्थानकावर उतरवून लोहमार्ग पोलिसांच्या (RPF) ताब्यात देण्यात आले. मुलीच्या पालकांनी पुण्यातील हिंजवाडी (Pune Hinjewadi) पोलिस ठाण्यात मुलगी हरविल्याची तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संकेत आणि संगीता (दोन्ही नावे बदलली आहेत) हे उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) एकाच गावचे रहिवासी आहेत. दोघांची आर्थिक परिस्थिती विशेष नाही. दोघांचे प्रेम होते. दरम्यान, संगीताचे आई-वडील संपूर्ण कुटुंबासह कामाच्या शोधात पुण्यात आले. तर दुसरीकडे संगीता पासून दूर असलेला संकेत आजारी पडला. त्याने संगीताला भेटायला पुण्याला (Pune) जायचे ठरवले. 


टीटीईला दिली माहिती अन् उतरवले स्टेशनवर


संकेत आणि संगीता यांची रेल्वे स्थानकावर (Railway Station) भेट झाली आणि तेथे त्यांनी लग्न करण्यासाठी उत्तर प्रदेशला (UP) पळून जाण्याचा बेत आखला. मात्र ते नागपूरला येणाऱ्या ट्रेनमध्ये बसले. दुसरीकडे, बराच वेळ होऊनही संगीता घरी न परतल्याने तिच्या पालकांनी हिंजवाडी पोलिस ठाण्यात हरविल्याची (Missing Complaint) तक्रार दाखल केली. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या संकेत आणि संगीता यांच्याबद्दल इतर सहप्रवाशांना संशय आला. त्यांनी आपली शंका टीटीईला सांगितली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून टीटीईने दोघांनाही स्टेशनवर उतरवले. त्यानंतर नागपूर लोहमार्गला (Nagpur RPF) माहिती देऊन संकेत आणि संगीता यांना जीआरपीच्या (GRP) ताब्यात देण्यात आले. पीआय मनिषा काशिद यांच्या सूचनेवरून महिला एएसआय दीपाली खरात व नाजनीन पठाण यांनी दोघांनाही विश्वासात घेऊन चौकशी केली असता हे प्रकरण प्रेमप्रकरण असल्याचे निष्पन्न झाले. तात्काळ संगीताच्या पालकांना फोन करून आपली मुलगी सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली. ते येईपर्यंत दोघांची बाल सुधारगृहात (In a juvenile detention center) रवानगी करण्यात आली. पालकांनी जीआरपी पोलिस स्टेशन गाठले आणि योग्य कागदपत्रांनंतर संगीताला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Raje Mudhoji Bhonsle : ...म्हणून नागपुरच्या भोसले कुटुंबात करतात चांदीच्या महालक्ष्मीची पुजा, गौरी पूजनाचे 314 वे वर्ष


Chandrapur Corruption : 50 लाखांची लाच, चार महिन्यानंतरही आरोपपत्र नाही; 'त्या' तीन अधिकाऱ्यांवर कोणाचा हात?