नागपूर : राज्यात सध्या एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री (DCM Bunglow) अशी राजकीय परिस्थिती आहे. त्यामुळे उपराजधानी नागपुरात उपमुख्यमंत्रीसाठी एकच बंगला असताना नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोणता शासकीय बंगला द्यावा असा प्रश्न सार्वजनिक बांधकाम खात्यासमोर निर्माण झाला आहे. कारण नागपुरात उपमुख्यमंत्री यांच्यासाठी असलेल्या देवगिरी बंगला आधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी बंगल्याचा शोध सुरू केला आहे.


 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी  तात्पुरत्या स्वरूपात रवी भवन येथील बंगला क्रमांक 6 निवडण्यात आला आहे. पुढील काही कालावधीसाठी अजित पवार यांचा नागपूर दौरा झाल्यास त्यांचे निवासस्थान आणि कार्यालय रवी भवन येथील सहा क्रमांकाच्या बंगला असणार आहे. तर उपराजधानीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी मोठ्या प्रशस्त आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य अशा बंगल्याचा शोध सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे. भविष्यात नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरात सह पोलीस आयुक्तांसाठीचा बंगला किंवा सदर परिसरात नागपूर मेट्रोचा कार्यालय म्हणून जो मोठा प्रशस्त बंगला वापरला जाऊ शकतो. त्या ठिकाणी अजित पवार यांचे नागपूरातील निवासस्थान निश्चित केले जाऊ शकतो. 


अजित पवारांचा मुंबईत देवगिरीवर मुक्काम


वर्षभर विरोधी पक्षनेते पदावर काम करत असताना अजित पवार यांना देवगिरी बंगला मिळाला होता. अजित पवार आणि देवगिरी बंगल्याचे नाते अतूट आहे कारण अजित पवारांनी या बंगल्यात जवळपास 16 वर्षाहून अधिक काळ वास्तव्य केले आहे. अजित पवार हे 1999 ते 2014 या काळात देवगिरी बंगल्यावरच राहत होते. त्यांनंतर 2014 ला भाजपची सत्ता आल्यानंतर हा बंगला सुधीर मुनगंटीवार यांना मिळाला. महाविकासआघाडीचे सरकार 2019 साली आल्यानंतर अजित पवारांना पुन्हा हा बंगला मिळाला होता. 


मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यानंतर देवगिरी बंगला हा भव्य मानला जातो. फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवत हा बंगला अजित पवार यांच्याकडे काम ठेवला आहे. फडणवीसांनी देवगिरी बंगला अजित पवारांना देत मैत्री जपल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याच्या पाहायला मिळत आहे. सागर बंगल्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा कारभार पाहणार आहे. 


हे ही वाचा :                         


Maharashtra Politics Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री! अजित पवार हे मुख्यमंत्री होणार नाही याची त्यांना पूर्वकल्पना: देवेंद्र फडणवीस