Weight Gain in Women After Marriage  : लग्नानंतरच्या आयुष्यात अनेक बदल होतात, मग ते सामाजिक असो, वैयक्तिक असो किंवा शारीरिक असो. असाच एक बदल जो अनेक स्त्रियांमध्ये दिसून येतो तो म्हणजे वजन (Weight) वाढणे. पण त्यामागे कोणती कारणे असू शकतात याचा कधी विचार केला आहे का?


जीवनशैलीतील बदल


लग्नानंतर स्त्रीच्या जीवनशैलीत अनेक बदल होतात. जास्त हालचाल होत नसल्याने कॅलरींचा वापर कमी होतो आणि वजन वाढते.


आहारात बदल


लग्नानंतर स्त्रिया आपल्या जोडीदाराच्या खाण्याच्या सवयी अंगीकारतात. जर त्यांच्या जोडीदाराचा आहार हेल्दी नसेल तर त्याचा परिणाम त्यांच्या वजनावर होतो.


हार्मोनल बदल


लग्नानंतर महिलांमध्ये हार्मोनल बदल होतात जे वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात. या बदलामुळे त्यांच्या अन्नाची इच्छा आणि शरीराच्या चयापचय दरावर परिणाम होऊ शकतो.


गर्भधारणा


गर्भधारणा हे देखील एक महत्त्वाचे कारण असू शकते. स्त्रियांचे या काळात नैसर्गिकरित्या वजन वाढते जे नंतर कमी करणे कठीण होऊ शकते.


तणाव 


लग्नानंतर तणाव वाढू शकतो. विशेषत: जे नोकरी किंवा व्यवसाय करणारे आहेत, त्यांच्यासाठी घरचा ताण आणि ऑफिसचा ताण दोन्ही वाढतात. या तणावामुळे वजन वाढू शकते. 


व्यायाम न करणे


नियमित व्यायाम करणाऱ्यांनाही लग्नानंतर त्या सवयीला ब्रेक लागू शकतो. कारण नवीन घरात गेल्यावर दिनचर्या गडबडून जाते. व्यायामाला वेळ नसतो. त्यामुळे सुद्धा वजन वाढते.


जास्त खाणे


बरेच लोक जास्त खातात. विशेषत: लग्नानंतर काही दिवस विविध प्रकारचे कार्यक्रम सुरूच असतात. यापैकी कशातही आहाराचे पालन करणे शक्य नाही.


झोप न लागणे 


लग्नानंतर नवीन घरात गेल्यावर झोपेचा त्रास होतो. अनेक मुलींची झोप उडते. त्यामुळे वजन वाढू शकते. पुरेशी झोप न मिळणे हे वजन वाढण्याचे एक कारण आहे.


जेवणाबाबतचे नियम 


बरेच लोक लग्नानंतर जेवणाबाबत कोणतेही नियम पाळत नाहीत. अतिरिक्त चरबीयुक्त पदार्थ खाण्यास सुरुवात केली जाते. परिणामी, वजन वाढते.


मानसिकता बदलणे 


लग्नापूर्वी मुली सुंदर दिसण्यासाठी नियमित व्यायाम आणि जिम करतात आणि खाण्यापिण्याचीही काळजी घेतात. पण लग्नानंतर विचार बदलतात. अनेक स्त्रिया विचार करू लागतात की आता आपले लग्न झाले आहे आणि आता फिटनेसची काय गरज आहे. या विचारामुळे वजन वाढू लागते.


 


इतर महत्वाच्या बातम्या


World Heritage Sites :40 पैकी पाच जागतिक वारसा स्थळं महाराष्ट्रात, अशी आहे यादी