Jammu Kashmir Pulwama Encounter: जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले. पुलवामामध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत एका पाकिस्तानीसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. ठार झालेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे सदस्य होते. या दहशतवाद्यांकडून शस्त्रे, स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.
काश्मीरमधील पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. त्यामध्ये एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश आहे. त्यांच्याजवळून दोन एम-4 कार्बाइन्स आणि एक एके-47 रायफल आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदगाम गावामध्ये शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. त्यावेळी दहशतवादी असलेल्या ठिकाणाला घेरण्यात आले. दहशतवाद्यांना शरणागती पत्करण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. अखेर चकमकीमध्ये तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
मंगळवारीदेखील दोन कुख्यात दहशतवादी ठार
मंगळवारी चार जानेवारी रोजी, श्रीनगरमधील हरवनमध्ये लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असलेल्या एका कुख्यात दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. सलीम पर्रे असे या दहशतवाद्याचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीच्या वेळी पाकिस्तानी दहशतवादी हाफिज हा फरार झाला. हाफिज उर्फ हमजा याच्यावर बांदिपोरामध्ये दोन पोलिसांची हत्या केल्याचा आरोप आहे. त्याशिवाय इतरही दहशतवादी कारवायांमध्ये तो गुंतला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Maharashtra Corona : राज्यात तुर्तास लॉकडाऊन नाही मात्र कडक निर्बंध लावले जाणार,आज नवीन नियमावली
- Terror Plan : नवीन वर्षात घुसखोरीचा पाकिस्तानचा नापाक कट उघड, कर्तारपूर कॉरिडोरमधून घुसखोरीचा कट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha