नवी दिल्ली : कंदहार म्हटलं तर अनेकांना आठवतो तो 24 डिसेंबर 1999 चा काळा दिवस. याच दिवशी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय विमानाचं अपहरण केलं आणि त्यातील प्रवाशांना जवळपास आठ दिवस ओलीस ठेवलं. आज या दुदैवी घटनेला 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. या विमानाच्या बदल्यात तत्कालीन वाजपेयी सरकारला दहशतवाद्यांसमोर नांगी टाकावी लागली होती आणि तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना सोडून द्यावं लागलं होतं.


नेमकं काय झालं होतं? 
आजपासून 22 वर्षांपूर्वी 24 डिसेंबर 1999 रोजी काठमांडूहून इंडियन एअरलाईन्सचं विमानानं IC-814 दिल्लीच्या दिशेने उड्डाण केलं होतं. त्या विमानामध्ये 180 प्रवासी होते. त्यापैकी 24 प्रवासी हे विदेश होते तर 11 क्रू मेंमर्स होते. उड्डाणानंतर 45 मिनीटांनी, हे विमान भारतीय भूमीत आलं. त्यामध्ये पाच पाकिस्तानी दहशतवादी प्रवास करत होते. त्यांनी या विमानाचं अपहरण केलं आणि ते विमान लाहोरच्या दिशेने निघालं. या विमानातून ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, फ्रान्स, इटली, जपान, स्पेन आणि अमेरिका या देशांचे नागरिकही प्रवास करत होते.


आठ दिवस चाललेलं थरारक नाट्य
अपहरणकर्त्यांनी हे विमान कंदहारला नेलं आणि या सर्व प्रवाशांना ओलीस ठेवलं. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अजहर, अहमद जरगर आणि शेख अहमद उमर सईद या तीन दहशतवाद्यांना भारताने अटक केली होती. या तिन्ही दहशतवाद्यांना सोडावं अशी मागणी या अपहरणकर्त्यांनी केली. या संबंधी दहशतवादी आणि भारत सरकारमध्ये आठ दिवस चर्चा सुरु होती. 


भारताकडे त्या वेळी कोणताही पर्याय नव्हता. भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी या तीन दहशतवाद्यांना सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार, वाजपेयी सरकारचे परराष्ट्रमंत्री जयवंत सिंह स्वतः या तीन कट्टरवाद्यांना कंदहारला घेऊन गेले. या दहशतवाद्यांना सोडल्यानंतर 31 डिसेंबरला विमानातील प्रवाशांची सुटका करण्यात आली.


कंदहार विमान अपहरण ही घटना भारतीय इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे दहशतवादी कोणत्या थराला जाऊ शकतात आणि भारतीय सुरक्षाव्यवस्था कशी भेदू शकतात याची प्रचिती आली.


महत्त्वाच्या बातम्या :