नागपूर: नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयातील  (Nanded Hospital Death Case) घटनेनंतर आता नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयातील आकडे तपासता गेल्या  24 तासांत 25 रुग्णाचा मृत्यू झाल्याचं आढळून आलंय. यात 16 रुग्ण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातले तर 9 रुग्ण हे इंदिरागांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यातले आहेत.  25 पैकी 12 रुग्ण हे शेवटच्या क्षणाला खासगी रुग्णालयातून शासकीय रुग्णालयात या रुग्णांना हलवण्यात आलं. दरम्यान खासगी रुग्णालय रुग्णांची स्थिती बघून त्यांना अॅडमिट करून घेतात, तर शासकीय रुग्णालयात सर्वांनाच अॅडमिट करून घ्यावं लागतं त्यामुळे मृत्यूचे हे मोठे आकडे दिसत असल्याचे रुग्णालयात प्रशासनाचं म्हणणं आहे. 


खासगी रुग्णालय आपल्या मृत्यूचा आकडा कमी करण्यासाठी शेवटच्या क्षणाला अत्यवयस्थ अवस्थेतील व्हेंटिलेटरवरचे रुग्ण शासकीय रुग्णालयात पाठवतात.  25 पैकी 12 रुग्ण हे शेवटच्या क्षणाला खाजगी रुग्णालयातून शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते.  यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 8 ते इंदिरा गांधी शासकीय महाविद्यात चार रुग्ण आले. खाजगी रुग्णालय रुग्णाची स्थित बघून अॅडमिट करून घेतात तर शासकीय रुग्णालयात सर्वांनाच अॅडमिट करून घ्यावे लागते त्यामुळे मृत्यूचे हे मोठे आकडे दिसत असल्याचे रुग्णालयात प्रशासनाचे म्हणणे आहे.  


महाराष्ट्रातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूतांडव


ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूतांडव सुरु आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 31 जणांचा मृत्यू झालाय.ज्यात १६ नवजात अर्भकांचा समावेश आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात एका दिवसात झालेल्या मृत्यूचा हा आजवरचा सर्वात मोठा आकडा आहे. एका बेडवर दोन ते तीन बालकांवर उपचार सुरू होते अशी धक्कादायक माहित आहे. एकमेकांना इन्फेक्शन होवून ही बालके दगावली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सलग सुट्ट्यांमुळे नांदेड शहरातली खाजगी रूग्णालये बंद होती. त्यामुळं सरकारी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली. तर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातही 24 तासात  18 जणांचा मृत्यू झाला  हे मृत्यू औषधांचा तुटवडा किंवा प्रशासनाच्या कमतेरतेमुळं झाले नाहीत असा दावा रुग्णालयाचे डीन संजय राठोड यांनी केला आहे.


राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर


राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे त्यामुळं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा राजीनामा घ्या अशी मागणी विरोधकांनी केली आहे. ठाण्याच्या कळवा रुग्णालयात झालेल्या मृत्यूतांडवाला जबाबदार कोण याचा अहवाल अजूनही आलेला नाही. तोपर्यंतच नांदेड आणि औरंगाबादमध्ये आणखी काही रुग्णांना जीव गमवावा लागलाय. सरकारी रुग्णालयांची  दुरवस्था आणि प्रशासनाची अनास्था पुन्हा एकदा उघडी पडली आहे.


हे ही वाचा :


एकाच बेडवर तीन-चार बालकांवर उपचार; नांदेड प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर; 'त्या' दोन दिवसांत नेमकं काय घडलं?