एक्स्प्लोर

पशुधन विकास अधिकारी पदासाठी परीक्षा देऊन दीड वर्ष निकालाची वाट पाहणाऱ्या हजारो परीक्षार्थींना दिलासा

पशुधन विकास अधिकारी पदासाठी परीक्षा देऊन दीड वर्ष निकालाची वाट पाहणाऱ्या हजारो पशु वैद्यकांना मॅटने दिलासा मिळाला आहे.

नागपूर : राज्याच्या पशु संवर्धन विभागाच्या 'पशुधन विकास अधिकारी' पदासाठी परीक्षा देऊनही दीड वर्ष फक्त निकालाची वाट पाहणाऱ्या हजारो पशु वैद्यकांना दिलासा मिळाला आहे. या प्रश्नासंर्भात परीक्षार्थींनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती. यावर मॅटने एमपीएससीला नऊ जूनपर्यंत परीक्षेचा निकाल लावावा अन्यथा निकालाची तारीख जाहीर करण्याची सूचना केली आहे.

परीक्षा देऊनही एका बाजूला महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग निकाल लावत नाही आणि त्याच कालावधीत पशु संवर्धन विभाग त्यांची पदे आउटसोर्सिंग/खाजगीकरणाच्या माध्यमातून भरण्याच्या घाट घालतो. या दुहेरी दुष्टचक्रात अडकलेल्या राज्याच्या पशु वैद्यकांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजेच मॅटकडे धाव घेतली होती. नुकतंच मॅटने परीक्षा झालेली असताना त्याचा निकाल लावण्यासाठी एमपीएससी दीड वर्षाचा कालावधी का लावत आहे असा प्रश्न विचारला आहे. सोबतच एमपीएससीने नऊ जूनपर्यंत एक तर या परीक्षेचा निकाल जाहीर करावा किंवा निकाल जाहीर करण्याची तारीख न्यायाधिकरणाला सांगावी अशी सूचनाही मॅटने केली आहे. 

दरम्यान सरकारी भरतीची प्रक्रिया अर्धवट असताना पशुसंवर्धन विभागाने संबंधित पदे आउटसोर्सिंगने भरण्यावर का भर द्यावा असा प्रश्नही मॅटने पशुसंवर्धन विभागाला विचारला आहे. विशेष म्हणजे एबीपी माझाने राज्यातील हजारो पशुवैद्यकांच्या रोजगाराच्या संधीशी संबंधित हा प्रश्न चव्हाट्यावर आणला होता. त्याच्या नंतरच पशुवैद्यकांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. आता मॅटने एमपीएससीला घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करत त्वरित मुलाखत घेण्यास सांगितले आहे.

प्रकरण काय आहे? 
राज्याच्या पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या रिक्त असलेल्या 435 पदांसाठी 23 ऑगस्ट 2019 रोजी जाहिरात आली होती तर 22 डिसेंबर 2019 रोजी एमपीएससीने लेखी परीक्षा घेतली होती. मात्र, त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे करत एमपीएससीने परीक्षेचा निकाल लावला नाही तर पशुसंवर्धन विभागाने भरतीची प्रक्रिया समोर नेण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. यावर्षी मार्च महिन्यात अचानकच पशुसंवर्धन विभागाने राज्याच्या ग्रामीण भागात पशुवैद्यकाची कमतरतेचा मुद्दा पुढे करत पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या 435 पैकी बहुतांशी पदं आउटसोर्सिंगने भरण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर राज्यातील हजारो पशुवैद्यकांमध्ये नाराजीची भावना होती. पशुसंवर्धन विभाग खाजगीकरणाच्या नावाखाली गरीब आणि शेतकरी कुटुंबातील मुलांची नोकरीची संधी हिरावून घेत असल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला होता. आता मॅटने दीड वर्षापूर्वी झालेल्या परीक्षेचा निकाल लावण्याचे निर्देश एमपीएससीला दिल्यामुळे रोजगाराच्या संधीची वाट पाहणाऱ्या हजारो पशुवैद्यकांना दिलासा मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sayaji Shinde On Tree Cutting: 'महाराष्ट्रात सध्या कोरोनासारख्या ‘झाडखाऊ’ व्हायरसची लागण', सयाजी शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल; कर्जतमधील प्रकल्पाविरोधात नागपुरात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
'महाराष्ट्रात सध्या कोरोनासारख्या ‘झाडखाऊ’ व्हायरसची लागण', सयाजी शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल; कर्जतमधील प्रकल्पाविरोधात नागपुरात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
Nagpur Crime News : खळबळजनक! चक्क पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांच्या फोटो अन् आवाजाची नक्कल करत 'विश्वास' घात; 'डिजिटल अरेस्ट'च्या नावे केली दीड कोटींची फसवणूक
खळबळजनक! चक्क पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांच्या फोटो अन् आवाजाची नक्कल करत 'विश्वास' घात; 'डिजिटल अरेस्ट'च्या नावे केली दीड कोटींची फसवणूक
Tiger Migration: नागपूर जिल्ह्यातील दक्षिण टोकावरून उत्तर टोकापर्यंत वाघोबाची 150 किलोमीटरची बिनधास्त भ्रमंती! उत्तम वन्यजीव कॉरिडॉर निर्माण झाल्याची पावती?
नागपूर जिल्ह्यातील दक्षिण टोकावरून उत्तर टोकापर्यंत वाघोबाची 150 किलोमीटरची बिनधास्त भ्रमंती! उत्तम वन्यजीव कॉरिडॉर निर्माण झाल्याची पावती? उमरेड कऱ्हांडल्याचा नर वाघ चर्चेत
दहा-10 लाख द्या, नाहीतर टायगर श्रॉफ सारखं उडवून टाकू; मुंबईनंतर नागपूर, 8 सराफा व्यावसायिकांना धमकीचं पत्र
दहा-10 लाख द्या, नाहीतर टायगर श्रॉफ सारखं उडवून टाकू; मुंबईनंतर नागपूर, 8 सराफा व्यावसायिकांना धमकीचं पत्र

व्हिडीओ

Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
Embed widget