नागपूर : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर (पूर्व) येथे दुचाकी वाहनाचा MH49-BV ही नोंदणी क्रमाकांची मालिका संपत असल्याने नवीन दुचाकी वाहनांकरीता MH49-BX अशी नवीन मालिका 25 ऑगस्ट पासून सुरु करण्यात येत आहे. नागरिकांना वाहनाकरीता पसंतीचा क्रमांक घ्यावयाचा असल्यास वा आरक्षित करावयाचा असल्यास त्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज पत्याचा पुरावा, फोटो ओळखपत्र, पॅनकार्ड व पसंतीचा नोंदणी क्रमांकासाठीच्या उप प्रादेशिक परिवहन अधीकारी, नागपूर (पूर्व) यांचे नावे काढलेल्या फीच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्षासहीत कार्यालयात स्वत: (नविन वाहन नोंदणी विभाग) येथे 24 ऑगस्ट रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 2.30 या कालावधीत सादर करावेत. (दुपारी 2.30 नंतर तसेच दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या माध्यमाने अर्ज स्वीकारले जाणार नाही), असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर (पूर्व) यांनी केले आहे.


डीलरशिपमध्येच वाहनांची नोंदणी


दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे. वाहनांचा नवीन नंबर 1 दिवसात येत आहे, तर नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया अवघ्या 2 ते 3 दिवसांत होत आहे. यासाठी कुठेही हेलपाट्या मारण्याची गरज राहिलेली नाही. मुख्यत: आरटीओची संपूर्ण जबाबदारी संपुष्टात आली आहे. संपूर्ण जबाबदारी वाहन विक्रेत्यांवर सोपवल्यामुळे हा मोठा बदल दिसून येत आहे. या आदेशानंतर जिल्ह्यातील किमान 750-1000 ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आतापर्यंतचा अनुभव खूप क्लिष्ट होता. वाहन घेऊनही अनेक दिवसपर्यंत वाहन नोंदणी होऊ शकत नव्हती. त्यामुळे ग्राहक व व्यापाऱ्यांना अनेकप्रकारे त्रासाला सामोरे जावे लागत होते. आरटीओ अधिकार्‍यांचा प्रत्येक डीलरशी बांधल्या गेल्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. वाहनाची नोंदणी करण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत होती. आरटीओ अधिकारी सायंकाळी वाहनांची तपासणी करून मंजुरी देत ​​असे, यामुळे विलंब व्हायचा.


Government Orphanage : 7 वर्षानंतर मध्यप्रदेश, केरळमधून मिळाली बालगृहातून बेपत्ता मुले


आधार लिंक नसल्यामुळे समस्या


यासंदर्भात एका डीलरने दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला सर्व काही सोपे झाले असून एक समस्या कायम आहे. ती म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे नोंदणी होत नाही. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या प्रक्रियेतही सुधारणा करणे आवश्यक झाले आहे. 


Smart India Hackathon: गुरुवारपासून स्मार्ट इंडिया हॅकाथॉन, 8 राज्यातून 27 संघ होणार सहभागी


सर्व प्रक्रिया डीलरकडे 


मुख्यत: सुमारे 1 वर्षापूर्वी डीलर्सना नोंदणीचे अधिकार देण्यात आले होते. तेव्हापासून तो संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करत आहे. हे काम ऑनलाइन होऊन डीलर्सच्या हातात गेल्याने आरटीओ अधिकाऱ्यांचा बराच वेळ वाचत असल्याची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली. आरटीओ आता इतर कामांवर लक्ष केंद्रित करीत आहेत. यात आता आमचा हस्तक्षेप नगण्य झाला आहे. आरटीओ कार्यालयात केवळ व्यावसायिक वाहने फिटनेस चाचणीसाठी आणली जात आहेत. आता त्यांना नोंदणीसाठी आरटीओमध्ये यावे लागेल. मात्र, अनेक राज्यांमध्ये व्यावसायिक वाहनांची नोंदणीही केवळ डीलर्सकडूनच केली जात आहे. लवकरच महाराष्ट्रातही ही प्रक्रिया सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. यासाठी एआरटीओचे डिजिटल स्वाक्षरी फीड डीलर्सना उपलब्ध करून दिले जात आहेत. परिवहन विभाग पेपरलेस करण्याची तयारी सरकारने केली आहे. विभागातील बहुतांश कामे ऑनलाइन होणार आहेत. वाहनधारकांनाही कामासाठी वारंवार आरटीओ कार्यालयात येण्याची गरज राहणार नाही.