नागपूरः केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल (MIC)दवारे स्मार्ट इंडिया हॅकाथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत देशात 75 केंद्रांवर ही  स्पर्धा होणार असून त्यापैकी एक केंद्र नागपुरातील जी एच रायसोनी अभियांत्रिकी महाविदयालय आहे. येथे 20 विविध राज्यातील 27 संघ सहभागी होतील. त्याचे उद्घाटन 25 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता शिक्षण मंत्रालयाच्या हस्ते होणार आहे.


स्मार्ट इंडिया हॅकाथॉन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलने विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना केंद्र सरकार मंत्रालय, विभाग उद्योग आणि इतर संस्थांना भेडसावणाऱ्या समस्यावर या व्यासपीठाद्वारे उपाय शोधता येतील. स्मार्ट इंडिया हॅकाथॉन हे जगातील एकमेव सर्वात मोठे ओपन इनोव्हेशन मॉडल आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यामध्ये समस्या सोडवण्याची संस्कृती रुजवली जाते. SIH सॉफ्टवेअर आणि SIH हार्डवेअर या दोन स्वरुपात उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 2017 पासून दरवर्षी आयोजित केले जात आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडवण्याची वृत्ती जपण्यासाठी यावर्षी स्मार्ट इंडिया हॅकाथॉन ज्युनिअर सुरू करण्यात आली आहे.


विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तराचे व्यासपीठ


2017 पासून सुरु झालेल्या या स्पर्धेची व्याप्ती वाढली असून यात दरवर्षी सहभागी होणान्या विद्यार्थ्यांचा उत्साह आणि समस्या मांडणाऱ्या संस्थांची संख्या सातत्याने वाढत आहे. दरवर्षी SIH या लाखो विद्याथ्यावर सकारात्मक परिणाम होत आहे. त्यांना राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ तर मिळत आहेच पण समस्येवर उपाय शोधण्याची प्रक्रिया जवळून शिकण्याची संधीही त्यांना मिळते. त्याचवेळी त्यांचा कल नावीन्य आणि उद्योजकतेकडे वाढत आहे. स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2022 हार्डवेअरची अंतिम स्पर्धा 25 ते 29 ऑगस्ट 2022 आणि सॉफ्टवेअरसाठी स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2020 25 ते 26 ऑगस्ट 2022 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. दरवर्षी मंत्रालय, विभाग, PSU आणि स्मार्ट इंडिया हॅकाथॉनमध्ये समस्या प्रदान करणाऱ्या खाजगी संस्थांची संख्या वाढत आहे. 


देशभरातील 75 संस्थांची निवड


कॅम्पस स्तरावरील 2033 विजेत्या संघातील 15000 विद्यार्थी यावर्षी राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या अंतिम फेरीत सहभागी होत आहेत. हे संघ अंतिम फेरीत नोडल केंद्रावर पोहोचतील आणि उपस्थित प्रॉब्लेमवर काम करतील. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत, केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) च्या इनोव्हेशन सेलने स्मार्ट इंडिया हॅकाथॉनद्वारे देशभरातील 75 संस्थाची निवड केली. जेणेकरून सहभागींना सर्व प्रकारच्या चांगल्या सुविधा मिळू शकतील. SI ला अंतिम रूप देण्यासाठी सर्व नोडल केंद्रांवर शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलने नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत.


Defense sector : संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील कौशल्य विकास, नोकरी प्रशिक्षण आता नागपुरात


पंतप्रधान साधणार संवाद


पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी स्मार्ट इंडिया हॅकाथॉनच्या सहभागींशी संवाद साधतात. यावर्षी 25 ऑगस्ट रोजी संध्याकाळी ते सहभागीशी संवाद साधू शकतात. दरवर्षी देशभरातील विविध नोडल केंद्रावर स्मार्ट इंडिया हॅकाथॉनचे आयोजन केले जाते. या केंद्रांमधून निवडक विद्यार्थ्यांची एक टीम उद्योग प्रतिनिधी, डिझाइन मेंटर्स आणि मूल्यांकनकर्त्यांसोबत संवाद साधणार आहे. अंतिम फेरीत विद्यार्थ्याचा संघ मेंटॉर आणि उद्योग / मंत्रालयाच्या प्रतिनिधींच्या मागदर्शनाखाली दिलेल्या प्रॉब्लेमवर चोवीस तास काम करेल.


27 संघातील 190 स्पर्धक


अंतिम फेरीसाठी स्मार्ट इंडिया हॅकाथॉनच्या सॉफ्टवेअर आवृत्तीसाठी जीएच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची नोडल केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे. 27 संघातील 190 स्पर्धक येथे सहभागी होणार आहेत. तसेच दिलेल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी कार्य करेल जीएच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे प्रदान केलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कार्य करेल. प्रत्येक समस्येवर तोडगा काढण्यासाठी एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. विद्यार्थी गटात विजेत्या संघाला 1 लाख 75.000 आणि 50.000 रुपयांची तीन बक्षिसे दिली जातील.


Jain Paryushan 2022 : पर्युषण पर्व दिनानिमित्त शहरातील कत्तलखाने बंद, 24 ऑगस्टपासून सुरु होतोय पर्व


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI